अमेरिकेतील टेक्सासमध्ये अज्ञाताकडून गोळीबार; 20 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

टेक्सासच्या एल पासो परिसरातील वॉलमार्टमध्ये ही घटना घडली. हा हल्ला 21 वर्षीय तरुणाने केला असून सीएनएनच्या वृत्तानुसार संशयित व्यक्तीची ओळख पटली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेतील टेक्सास शहरात शनिवारी एका अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी आहेत.

टेक्सासच्या एल पासो परिसरातील वॉलमार्टमध्ये ही घटना घडली. हा हल्ला 21 वर्षीय तरुणाने केला असून सीएनएनच्या वृत्तानुसार संशयित व्यक्तीची ओळख पटली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

ट्रम्प यांनी लिहिले आहे, की आज एल पासो, टेक्सास येथे झालेला गोळीबार आणि हल्ला ही केवळ दुःखदायक व क्रूर घटना नसून हा एक भ्याड हल्ला होता. अशा प्रकारच्या हल्लेखोरांचा मी निषेध करतो. या हल्ल्यात जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. निष्पाप लोकांना ठार मारण्याच्या कृत्याचे समर्थन कधीही होऊ शकत नाही.

शनिवारी (विकेंड) असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. हल्लेखोराने काळा टी-शर्ट घातला होता आणि कानात हेडफोन घातले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 people killed in El Paso shooting Texas governor says