Turkey Mine Blast : कोळसा खाणीत मोठा स्फोट; 22 कामगार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

22 killed dozens trapped in Turkey coal mine blast

Turkey Mine Blast : कोळसा खाणीत मोठा स्फोट; 22 कामगार ठार

उत्तर तुर्कीतील कोळसा खाणीत स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत २२ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढणायची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.(22 killed dozens trapped in Turkey coal mine blast)

बार्टिनच्या काळ्या समुद्र किनारी भागातील अमासरा शहरातील सरकारी टीटीके अमासरा मुसेसे मुदुरलुगु खाणीत शुक्रवारी हा स्फोट झाला. हा स्फोट फायरॅम्पमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज ऊर्जा मंत्री फातिह डोनमेझ सांगितला आहे.

बार्टिन गव्हर्नरच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सुमारे 15:15 वाजता खाणीच्या प्रवेशद्वारापासून 300 मीटर खाली स्फोट झाला. यामध्ये 44 जण खाणीच्या प्रवेशद्वारापासून 300 मीटर खाली तर 5 जण सुमारे 350 मीटर खाली अडकले होते.

गृह मंत्री सुलेमान सोयलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान खाणीमध्ये ११० कामगार होते. स्फोटानंतर बहुतेक कामगार पळून जाण्यात यशस्वी झाले होते, परंतु 49 लोक अतिजोखमीच्या भागात अडकले होते. ते म्हणाले की, अजूनही किती लोक खाणीत अडकले आहेत, हे माहित नाही कारण त्या ४९ जणांपैकी अनेकांना वाचवण्यात यश आले आहे.

या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी ट्विटरवर दिली. त्याचवेळी, तुर्कीची आपत्ती व्यवस्थापन संस्था एएफएडीने सांगितले की, 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

टॅग्स :blast