अमेरिकेतील शहरात 250 डुक्करांनी घातला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पळून गेलेल्या 250 डुक्करांनी वर्मोंट वासीयांची झोप उडविली असून या सर्वांना त्यांच्या आवडत्या खाद्याच्या वासाने परत आणण्यात येत आहे.

वर्मोंट : गेल्या महिन्यात अमेरिकेच्या वर्मोंट शहरात गोठ्यातून पळून गेलेल्या 250 डुकरांनी संपूर्ण शहरात हैदोस घातला होता. दरम्यान सध्या त्यातील ब-यापैकी डुक्कर पुन्हा आपल्या घरी आली असून त्यांना आणण्यासाठी त्यांच्या आवडत्या खाद्याचा उपयोग करण्यात आला. यात तेथील रहिवाशांनी देखील मदत केली.  

वॅाल्टर जेफ्रिस असे डुक्करांच्या मालकाचे नाव असून ते शेतकरी आहेत. 11 आगस्ट, 2019 रोजी रात्रीच्या सुमारास अचानक जेफ्रिस यांच्या डुक्करांच्या गोठ्याचा दरवाजा उघडला गेला, ज्यामुळे सर्वच्या सर्व 250 डुक्कर पळून गेले. दरम्यान जेफ्रिस यांच्या मते हे काम त्यांच्याकडे पूर्वी काम करणा-या एका नोकराचे असून त्यांनी त्याच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.   

तसेच आतापर्यंत ब-यापैकी सर्व डुकरे घरी परतली असल्याची माहिती जेफ्रिस यांनी दिली आहे. तसेच त्यांच्या डुक्करांनी शहरभर केलेल्या नुकसानीसाठी त्यांना प्रशासन दंड आकारणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 250 pigs created havoc in Vermont at usa