26/11 हल्ल्यातील पीडितांच्या आठवणीत इस्त्रायलमध्ये उभं राहणार स्मारक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

ऐलात : इस्त्रायलच्या दक्षिण किनाऱ्यावरील ऐलात या शहरामध्ये अमेरिकेत 9/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच मुंबईमधील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या आठवणीमध्ये एक स्मारक उभं करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुंबईमध्ये 2008 मध्ये दहशतवादी हल्ल्यादरम्यान यहुदी लोकांचे प्रार्थना स्थळ चबाड हाऊसला देखील लक्ष्य केलं गेलं होतं. पाकिस्तानच्या लष्कर-ए-तय्यबाच्या 10 दहशतवाद्यांनी चार दिवस मुंबईमध्ये नृशंस असे  हत्याकांड घडवून आणले होते. चबाड हाऊसमध्ये सहा ज्यूंसमवेत मुंबईतील कमीतकमी 166 लोक मारले गेले होते तसेच 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. 

हेही वाचा - 26/11: कसाबसह खात्मा झालेल्या 10 दहशतवाद्यांसाठी हाफिज सईदची 'नापाक' सभा
ऐलातमध्ये प्रवासी यहुदींसाठी सितार ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधींनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, आम्ही मुंबई हल्ल्यातील पीडितांच्या आठवणीत एक स्मारक स्थापन करण्यासाठी ऐलातचे महापौर मीर इत्जाक हा लेवीसोबत चर्चा केलीय. महापौरांनी म्हटलंय की, ते त्या समितीत आहेत जे चौक आणि स्माराक इत्यादींच्या स्थापनेबाबत, नामकरणासंदर्भातील निर्णय घेतात. प्रतिनिधींनी म्हटलंय की, याशिवाय, महापौरांनी इंडिया-इस्रायल फ्रेण्डीशीप स्वेअर  अथवा महात्मा गांधी चौकदेखील स्थापन करण्याचा निर्णय दिला आहे जिथे मुंबई हल्ल्यातील पीडितांच्या आठवणीत एक स्मारक उभारलं जाऊ शकतं. 

हेही वाचा - कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी परदेशी तज्ज्ञांचे पथक लवकरच चीनमध्ये
शहरात चबाड मूव्हमेंटचे सिनेगॉग चबाड हाऊसमध्ये हल्ल्यात मारल्या गेलेल्या सहा ज्यूंच्या आठवणीत एक पट्टीका लावण्याचा विचार करत आहेत. सितार ऑर्गनायझेशनने सांगितलं की, सिनेगॉगच्या प्रवेशस्थळावर एक पट्टीका लावली जाईल. मागच्या आठवड्यात बीरसेबा शहरात चबाड हाऊसने मुंबई हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. 

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये 166 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले होते. तर ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचे प्राण घेतले. जवळजवळ 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 11 mumbai terror attacks israel contemplating building memorial for victims