कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी परदेशी तज्ज्ञांचे पथक लवकरच चीनमध्ये

michael-ryan
michael-ryan

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) - कोरोना विषाणूच्या प्राण्यांमधील मुळाबाबत चौकशी करण्यासाठी परदेशी तज्ज्ञांचे पथक लवकरच चीन दौऱ्यावर जाण्याची अपेक्षा आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या(डब्लूएचओ) आणीबाणीकालीन उपक्रमांचे संचालक मायकेल रायन यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले की, प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आवश्यक सोयींची जुळवाजुळव लवकरात लवकर केली जाईल असे खात्रीशीर आश्वासन चीन सरकारमधील सहकाऱ्यांनी दिले आहे. असे पथक पाठवण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून डब्लूएचओकडून तयारी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पथकाला चिनी सहकाऱ्यांच्या साथीत सहभागी होता आले पाहिजे. चिनने केलेली चौकशी तसेच अभ्यासाच्या निष्कर्षांचा आढावा घेऊन त्याची प्रत्यक्ष ठिकाणाबाबतच्या आकडेवारीशी पडताळणी केली गेली पाहिजे. हे फार महत्त्वाचे आहे आणि तसे घडेल अशी आमची अपेक्षा कायम आहे.

पथकाचे स्वरूप
गेल्या महिन्यात डब्ल्यूएचओने दहा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक स्थापन केले. चिनी सरकाऱ्यांबरोबर त्यांची व्हर्च्युअल बैठकही झाली आहे. दौऱ्याची तयारी करीत असताना असा बैठका नियमितपणे होत आहेत.

पथकात साथरोगतज्ज्ञ, प्राणी आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असेल. कोरोना विषाणूचे प्राण्यांमधील मूळ आणि त्याचा माणसांमध्ये कसा संसर्ग झाला याची चौकशी केली जाईल. 

जुलैमध्ये डब्ल्यूएचओने एक प्रगत पथक बीजिंगला पाठविले होते. आंतरराष्ट्रीय चौकशीची तयारी करण्याचे काम त्यांच्याकडे होते, पण शास्त्रज्ञांचे मोठे पथक केव्हा जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे. पहिला मानवी रुग्ण आणि त्याच्या संसर्गाचे स्रोत तपासण्यात येणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • वुहानमधील प्राण्यांच्या मांसाची विक्री होणाऱ्या बाजारपेठेतून कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे शास्त्रज्ञांचे प्रारंभचे मत
  • आता मात्र ही बाजारपेठ संसर्गाचे उगमस्थान नसून संक्रमणात गुणोत्तरीय वाढ झालेले ठिकाण असल्याचे मत
  • वटवाघुळामुळे माणसांना लागण झाल्याचा सार्वत्रिक समज
  • प्रत्यक्ष वाहक ठरलेला प्राणी मात्र अद्याप माहीत नाही

चीनची प्रशंसा...
मायकेल रायन यांनी चिनने केलेल्या व्यापक शास्त्रीय संशोधनाची प्रशंसा केली. त्याचवेळी शास्त्राच्या दर्जाबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाची खात्री पटावी म्हणून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचे त्यानी आवर्जून नमूद केले.

कोरोना विषाणूचे मूळ आपल्या सर्वांना समजणे गरजे आहे ही बाब स्पष्ट आहे. तो कशापासून आला हे समजले पाहिजे, जे भविष्यात पुन्हा संसर्ग होऊ शकतो का हे समजण्यासाठी किमानपक्षी आवश्यक आहे.  चिनी सहकारी सुद्धा या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आतुर असतील याची मला खात्री आहे.
- मायकेल रायन

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com