esakal | बांगलादेशात बोट उलटून २६ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

bangladesh

बांगलादेशात बोट उलटून 26 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

ढाका : Boat Accident In Bangladesh क्षमतेपेक्षाही अधिक प्रवाशांनी भरलेली फेरी बोट पद्मा नदीत उलटून झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. कोरोना नियमांचे आणि प्रवासी क्षमतेचे उल्लंघन करून या बोटीतून मानवी वाहतूक होत होती. आज सकाळी कंथलबारी फेरी टर्मिनल येथून निघालेली ही बोट नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेल्या एका मोठ्या बोटीला जाऊन धडकली, असे पोलिसांनी सांगितले. एक अनुभव नसलेला युवक ही बोट चालवत होता. अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण बचावले. बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होत असल्याने अनेक वेळा अपघात होतात. (25 Killed In Boat Accident In Bangladesh)

हेही वाचा: वंगभंग, बंगबंधू आणि बांगलादेश

बोटीमध्ये 30 प्रवासी होते. बांगलादेशमध्ये जलवाहतुकीदरम्यान अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. सुरक्षा साधनांची कमतरता, क्षमतेपेक्षा जास्त लोकांची वाहतूक, कामचलावू बोटींमुळे अपघातात वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. एप्रिलमध्ये झालेल्या अशाच एका अपघातात 30 लोकांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात एका छोड्या बोटीला मोठ्या मालवाहतूक बोटीने धडक दिली होती. त्यात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

loading image