
28 टक्के पाकिस्तानी छाती ठोकून सांगतात, 'कोरोना पूर्णपणे संपलाय'
नवी दिल्ली : मार्केट रिसर्च कंपनीनं एक महत्त्वाचं सर्वेक्षण केलं आहे. 34 देशांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात असं दिसून आलंय की, कोरोना हा साथीचा रोग आता पूर्णपणे संपला आहे असं वाटणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी (Pakistan) लोकांचा वाटा सर्वाधिक आहे.
हेही वाचा: मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद
'कोविड-19: कोरोना रोग कधीतरी संपेल आणि त्याबाबत आपल्याला कसे कळेल?' ('Covid-19: Will The Pandemic Ever End and How Will We Know?' ) असा इप्सॉनने केलेले हे सर्वेक्षणात आहे. या सर्वेक्षणाबाबत पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने (Dawn) एक वृत्त दिलंय की, इप्सॉसने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलंय की, 28 टक्के पाकिस्तानी लोकांचं मत होतं की कोरोना रोगाची महासाथ आधीच संपली आहे. इतर देशांतील केवळ 9 टक्के लोकांनाच असं वाटतं. म्हणजे ही भावना सर्वाधिक पाकिस्तानी नागरिकांमध्येच दिसून आली आहे.
या सर्वेक्षणात 18-74 वर्षे वयोगटातील 22,023 प्रौढांचे नमुने घेण्यात आले होते. पाकिस्तान, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, इटली, जपान, स्पेन, अर्जेंटिना बेल्जियम, चिली, कोलंबिया, डेन्मार्क, हंगेरी, भारत, इस्रायल, मलेशिया, मेक्सिको, नेदरलँड, पेरू, पोलंड, रोमानिया, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
हेही वाचा: मुंबई विमानतळावर कोरोना टेस्टचा घोळ; UK स्थित भारतीयाचा आरोप
दुसर्या एका प्रश्नाला उत्तर देताना, किमान 14 टक्के लोकांचा असा विश्वास होता की ही कोरोना महामारी कधीच संपणार नाहीये, अशीही माहिती डॉनने दिली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटीव्हीचा दर वाढत असताना, पाकिस्तानचे नियोजन मंत्री असद उमर यांनी सोमवारी इशारा दिलाय की, कोरोनाची आणखी एक लाट सध्या आल्याचा स्पष्ट पुरावा आहे. कारण, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषतः कराचीमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्ण वाढत असल्याचंही डॉनने म्हटलंय. नॅशनल कमांड अँड ऑपरेशन्स सेंटर (NCOC) च्या डेटावरून असं दिसून आलंय की, 31 डिसेंबर रोजी पॉझिटीव्हीटी रेट 1.08 टक्के होता, तो रविवारी आता 1.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.
शिवाय, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये कोरोना प्रकरणांची संख्या दुप्पट झाली आहे. रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, 27 डिसेंबर रोजी 291 प्रकरणांच्या तुलनेत 594 प्रकरणे नोंदवली गेली होती. रविवारी किमान 637 रुग्ण गंभीर अवस्थेत होते, असे वृत्त डॉनने दिले आहे. असद उमर यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळेच ही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
Web Title: 28 Percent Pakistanis Think Covid 19 Pandemic Has Ended Survey Report
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..