Omicron: मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Schools closedDecember

मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद

मुंबई: कोरोनाचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा धोका वाढला असून त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) प्रमुख आयएस चहल यांनी सांगितलंय की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता 1 ते 9 पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील.

हेही वाचा: मुंबई विमानतळावर कोरोना टेस्टचा घोळ; UK स्थित भारतीयाचा आरोप

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत एक पत्र जाहीर करण्यात आलंय. त्या पत्रात म्हटलंय की, सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमीकोन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या प्रजातीचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमिक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ.9 वी व 11 वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ने दि. 31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत.

हेही वाचा: ठरलं..! राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला

विद्यार्थ्याचे तथापि, इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरु राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणा-या 15 ने 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top