
पनामा सिटी : बेकायदा वास्तव्याबद्दल अमेरिकेने देशाबाहेर काढलेल्या, मात्र संबंधित देशांमध्ये पाठविण्याची सोय न झालेल्या सुमारे ३०० स्थलांतरितांना पनामा देशातील एका हा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या स्थलांतरितांमध्ये काही भारतीय व्यक्तीही आहेत. यापैकी कोणालाही हॉटेलबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असल्याने ते अडकून पडले आहेत. या सर्वांना मायदेशी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पनामामधील अधिकाऱ्यांनी सांगितले.