South Africa Bus Accident: दक्षिण आफ्रिकेत बस पुलावरून दरीत कोसळली; ४६ प्रवाशांपैकी ४५ जण ठार

South Africa bus accident: दक्षिण आफ्रिकेत एक भीषण बस अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
45 people killed one 8 year old child hospitalized in terrible bus accident in South Africa marathi news
45 people killed one 8 year old child hospitalized in terrible bus accident in South Africa marathi news

South Africa bus accident: दक्षिण आफ्रिकेत एक भीषण बस अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत एक पुलावरून बस ५० मिटर खाली दरीत कोसळली, ज्यामध्ये बसमधील ४६ पैकी ४५ प्रवासी ठार झाले आहेत. या दुर्घटनेत फक्त एक आठ वर्षीय मुलगी बचावली असून तिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस पुलावरील बॅरियरला धडकून दरीत कोसळली, त्यानंतर बसला आग लागली. बस बोत्सवाना (Botswana) देशात इस्टर (Easter) भाविकांना घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर पूर्व भागातील लिम्पोपो (Limpopo Province) प्रांतातील शहर मोरिया येथे जात होती.

बीबीसीच्या रिपोर्नुसार, दक्षिण आफ्रिकेतील पब्लिक ब्रॉडकास्टर एसएबीसीने दिलेल्या माहितीनुसार बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने जोहान्सबर्गपासून तब्बल ३०० किमी दूर उत्तरेला मोकोपेन आणि मार्केन दरम्यान एका पुलावर हा अपघात झाला. दरम्यान गुरूवारी रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

45 people killed one 8 year old child hospitalized in terrible bus accident in South Africa marathi news
Loksabha Election 2024 : मतदार संघातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणाऱ्या बरोबर मी जाणार ; माजी आमदार रमेश कदम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com