ख्रिसमस परेडमध्ये घुसली कार; 5 जणांचा चिरडून मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद | Wisconsin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ख्रिसमस परेडमध्ये घुसली कार; 5 जणांचा चिरडून मृत्यू

ख्रिसमस परेडमध्ये घुसली कार; 5 जणांचा चिरडून मृत्यू

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अमेरिका : अमेरिकेतील विस्कन्सिन (Wisconsin) स्टेटमध्ये नाताळच्या तोंडावर एक थरारक घटना घडली आहे. नाताळचा जल्लोष करत (Christmas parade) ख्रिसमस परेड आयोजन करण्यात आलं होतं. अशातच एक अघटीत घटना घडली आहे, एका कारने परेडमध्ये घुसून धडक दिल्यामुळे किमान पाच जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कार नागरिकांना चिरडत असतानाची दृ श्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

अशी घडली थरारक घटना...

ही घटना स्थानिक वेळेनुसार रविवार 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:30 वाजता (22.30 GMT) च्या सुमारास घडली. मिलवॉकी उपनगरातील वाउकेशा शहरातील प्रेक्षक या वार्षिक परेड सोहळ्यात सहभागी झाले होते. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, एसयूव्ही कार शाळेच्या मार्चिंग बँडच्या मागून या परेडमध्ये घुसली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: नवाब मलिक अचानक दुबईला का गेले?

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकूण 11 प्रौढ आणि 12 लहान मुलांना विविध सहा रुग्णालयात नेण्यात आले, असे अग्निशमन प्रमुख स्टीव्हन हॉवर्ड यांनी पत्रकारांना सांगितले. संशयित कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे. विस्कन्सिनचे गव्हर्नर टोनी एव्हर्स यांनी सांगितले की ते आणि त्यांची पत्नी या अपघातात जखमी अथवा बळी गेलेल्या सर्व मुले, कुटुंबे आणि इतर सदस्यांसाठी प्रार्थना करत आहेत.”

loading image
go to top