नवाब मलिक अचानक दुबईला का गेले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik
नवाब मलिक अचानक दुबईला का गेले?

नवाब मलिक अचानक दुबईला का गेले?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik in Dubai) गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे ते सतत माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. तर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून मलिकांवर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नुकताच नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) मुस्लीम वेशात दिसून येता आहेत. मात्र हा फोटो जेव्हे त्यांनी टाकला, तेव्हा ते दुबईत होते. आरोप प्रत्यारोपांची ही मालिका सुरू असताना नवाब मलिक हे थेट दुबईला का गेले? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय.

नवाब मलिक यांनी आपण दुबईला जात असल्याची घोषणा स्वत: केली. "सर्वांना नमस्कार, तुम्हाला कळवतो की, मी आमच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या घेऊन दुबईला जात आहे." असे म्हणत त्यांनी ही माहिती दिली. नवाब मलिक यांनी दहशतवाद्यांशीच व्यवहार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे ते जर विदेशात जाणार असतील तर त्यांच्यावरच्या या आरोपांनी पुन्हा तोंड वर काढलं असतं यात शंका नाही.

हेही वाचा: समीर वानखेडेंच्या लग्नाचा निकाहनामा समोर, मलिकांचा बॉंम्ब

त्यामुळे मलिक यांनी स्वत:च तपास यंत्रणांना आपल्यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. "सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि माझ्या हालचालींचा मागोवा घ्यावा ही विनंती" असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. मात्र या सर्व घडामोडी सूरू असताना ते अचानक दुबईत का गेले? तर त्याचं कारण दुबई एक्सपो असल्याचं समजतंय. प्राथमिक माहितीनूसार दुबईमध्ये सुरू असणाऱ्या Expo 2020 Dubai या कार्यक्रमासाठी ते दुबईत गेले आहेत.

हेही वाचा: 'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक आर्किटेक्चर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परस्परसंवादी प्रदर्शनांची विस्तृत श्रेणी ऑफर करून, जगातील सर्व प्रगतीशील विचारांना एकाच ठिकाणी आणण्यासाठी हा एक्सपो आयोजित केला गेला असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मलिक दुबईला गेले आहेत.

हेही वाचा: मलिकांना उत्तर, समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो आले समोर

या ठिकाणी वेगवेळ्या देशांचे पवेलियन तयार करण्यात आलेले आहेत. यातील इंडिया पवेलियन, दुबई पवेलियन, इस्राईल पवेलिय, अमेरिका पवेलियन अशा अनेक ठिकाणी मलिकांनी भेट दिली असून आणखी काही ठिकाणी देखील ते भेट देणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते खासगी कामांसाठी कुठे जाणार आहेत का या बद्दल अद्याप माहिती मिळाली नसली तरी ते २४ नोव्हेंबरला भारतात येणार आहेत.

loading image
go to top