esakal | विमानात बसले तेव्हा १८८ जण निगेटिव्ह; उतरले तेव्हा ५२ जणांना कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Vistara Airlines

दिल्लीहून १८८ प्रवाशांना घेऊन विस्ताराच्या एका विमानाने हाँगकाँगकडे प्रस्थान केले. विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आणि सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

विमानात बसले तेव्हा १८८ जण निगेटिव्ह; उतरले तेव्हा ५२ जणांना कोरोना

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Updates : नवी दिल्ली : अख्ख जग कोरोना महामारीनं त्रस्त झालं आहे. दररोज नवनवे विक्रम होत चालले आहेत. कोरोना कधी आटोक्यात येणार याचीच वाट सर्वजण पाहात आहेत. मास्क वापरणे आणि कोरोना संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे हेच कोरोनाला रोखण्याचे उपाय आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी काही देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाहतूक तसेच इतर निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेत काही देशात अजूनही विमान वाहतूक सुरू आहे. कोरोना चाचणी अहवाल असल्याशिवाय कोणालाही इतर देशात प्रवास करता येत नाहीय. पण दिल्ली-हाँगकाँग प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

हेही वाचा: Fight with Corona: केंद्राकडून राज्यांसाठी नऊ मार्गदर्शक सूचना

दिल्लीहून १८८ प्रवाशांना घेऊन विस्ताराच्या एका विमानाने हाँगकाँगकडे प्रस्थान केले. विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आणि सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. ९ तासाच्या प्रवासानंतर हे सर्व प्रवासी जेव्हा हाँगकाँगमध्ये उतरले तेव्हा तेथील विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांची पुन्हा कोरोना चाचणी केली. तेव्हा ५२ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

भारतातून हाँगकाँगला गेलेल्या १८८ पैकी ५२ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच विमानतळावर गोंधळ उडाला होता. विमान प्रवासात कोरोनाचा संसर्ग कसा झाला, हा प्रश्न सर्वांना पडला होता. हाँगकाँग विमानतळ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, कोरोना संक्रमण ७२ तासांनी होते. नवी दिल्ली विमानतळावर असतानाच प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असेल किंवा भारतात केल्या जात असलेल्या टेस्टमध्ये काही कमतरता असेल. त्यामुळेच कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले नाही. हाँगकाँगमध्ये सर्व प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

हेही वाचा: Corona Update: 24 तासात अडीच लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

भारतीय प्रवाशांवर बंदी

भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. कोरोनाचा हा म्युटंट अधिक धोकादायक असून त्यामुळे अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे अनेक देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातली आहे. मालदीवनेही भारतीय प्रवाशांना बंदी घातली आहे.

हाँगकाँगमध्ये चर्चा

कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना भारतातून आलेल्या ५२ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच पूर्ण हाँगकाँगमध्ये चर्चांणा उधाण आले होते. हाँगकाँगमध्ये कोरोनाची चौथी लाट आहे. पण तेथील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. जेव्हा ५२ भारतीय प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले तेव्हा पूर्ण हाँगकाँगमधील कोरोना रुग्णांची संख्याही त्यापेक्षा कमी होती.

loading image