esakal | Corona Update: 24 तासात अडीच लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19 Patient

रविवारच्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्येत थोडी घट झाल्याचे दिसून आले.

Corona Update: 24 तासात अडीच लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Updates: नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना व्हायरसनं धूमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाहीय. गेल्या सहा दिवसांपासून दररोज तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी (ता.२६) दिवसभरात देशात तब्बल ३ लाख २३ हजार हून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्येत थोडी घट झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Fight with Corona: केंद्राकडून राज्यांसाठी नऊ मार्गदर्शक सूचना

भारतात सोमवारी (ता.२६) दिवसभरात ३ लाख २३ हजार १४४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ एवढी झाली आहे. सलग सहाव्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. सध्या देशात २८ लाख ८२ हजार २०४ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात २ लाख ५१ हजार ८२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग चौथ्या दिवशी दोन लाखाहून अधिकजणांना घरी पाठविण्यात आलं आहे. ही संख्या वाढत आहे. आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी दिवसभरात २ हजार ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचला आहे.

हेही वाचा: ब्रिटनची भारताला मदत; व्हेंटिलेटरची पहिली खेप पोहोचली

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांना लसीकरण करण्यात आलं आहे. सोमवारी दिवसभरात १६ लाख ५८ हजार ७०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. देशात आतापर्यंत २८ कोटी ९ लाख ७९ हजार ८७७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

दरम्यान एप्रिल महिन्यात (रविवारच्या आकडेवारीसह) ५१ लाख ६३ हजार ८२८ नवे रुग्ण आढळले आहेत. मार्च महिन्यात १० लाख २५ हजार ८६३, फेब्रुवारीमध्ये ३ लाख ५० हजार ५४८ नवे रुग्ण आढळले होते. फेब्रुवारी महिन्यात जेवढे रुग्ण आढळले होते, तेवढे रुग्ण सध्या दिवसभरात आढळत आहेत. यावरून परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

loading image