पाकिस्तानमध्ये पावसाचा कहर; ५८ जणांचा मृत्यू

टीम ई सकाळ
Monday, 10 August 2020

पाकिस्तानमध्ये पावसाने कहर केला असून वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने ५८ जणांचा बळी घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून पाकिस्तानामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. पाकिस्तानमधील प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत पावसामुळे झालेल्या मृत्यूंचा पाकिस्तानमधील आकडा हा ५८ आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पावसाने कहर केला असून वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने ५८ जणांचा बळी घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून पाकिस्तानामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. पाकिस्तानमधील प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत पावसामुळे झालेल्या मृत्यूंचा पाकिस्तानमधील आकडा हा ५८ आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणने सांगितले आहे की, खैबर पख्तूनख्वा या प्रांतात पावसाचा सर्वाधिक प्रभाव आहे. या भागात एकूण १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सिंध प्रांतात एकूण १२ लोकांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. गिलगिट मध्ये दहा, पंजाब आणि बलूचिस्तान प्रांतात आठ आणि पाकव्याप्त काश्मीर भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पूरामुळे १५८ घरांचा विध्वंस झाला असून १२८ घरांची काही प्रमाणात पडझड झाली आहे. सिंध प्रांतात मदतकार्य चालू असून दादू जिल्ह्यात बचावकार्य करण्यात आले तिथे एकूण २० गावे पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर बलूचिस्तानच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणांकडून बचावकार्य करण्यात आले आहे. दरम्यान पाकिस्तानच्या हवामान खात्याकडून पुढील आठवड्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 58 People Died Due To Heavy Rains In Pakistan