अमेरिकेत हॉटेलला आग सहा जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

मिशिगनमध्ये एका हॉटेलला काल लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांत पाच मुलांचा समावेश आहे. या घटनेसंदर्भात शेरिफ कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली. बेरियन कौंटीच्या शेरीफ कार्यालयाने म्हटले, की सहावी पीडित 26 वर्षीय महिलेचा या पाच मुलांशी संबंध असावा, मात्र अद्याप ठोस माहिती हाती लागली नाही. हॉटेलच्या आगीचे कारण समजू शकले नाही. 

वॉशिंग्टन : मिशिगनमध्ये एका हॉटेलला काल लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांत पाच मुलांचा समावेश आहे. या घटनेसंदर्भात शेरिफ कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली. बेरियन कौंटीच्या शेरीफ कार्यालयाने म्हटले, की सहावी पीडित 26 वर्षीय महिलेचा या पाच मुलांशी संबंध असावा, मात्र अद्याप ठोस माहिती हाती लागली नाही. हॉटेलच्या आगीचे कारण समजू शकले नाही. 

सोडस टाउनशिप येथील कॉस्मो एक्‍सटेंडेड लिव्हिंग हॉटेलमध्ये ही अचानक आग भडकली. मृत्युमुखी पडलेले सहाही जण एकाच कुटुंबातील होते. धूर आणि आगीच्या झळांमुळे आठ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मृतांतील मुलांचे वय दोन ते दहा वर्षांदरम्यान होते. गेल्या वर्षी जॉर्जियातही हॉटेलमध्ये आग लागली होती. बाटुमी शहरात असलेल्या हॉटेलला लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि दहा-बारा नागरिक जखमी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 killed in massive hotel fire in Berrien County