धक्कादायक! 6 वर्षाच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेवर झाडल्या गोळ्या; शाळेत एकच खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

6 year old boy shoots teacher in us school

धक्कादायक! 6 वर्षाच्या मुलाने शिक्षिकेवर झाडल्या गोळ्या; शाळेत एकच खळबळ

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या पूर्वेतील व्हर्जिनिया राज्यातील प्राथमिक शाळेच्या वर्गात शुक्रवारी एका सहा वर्षांच्या मुलाने गोळीबार केला, त्यात एक शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने या घटनेत रिचनेक एलिमेंटरी स्कूलमधील एकही विद्यार्थी जखमी झाला नाही. (6 year old boy shoots teacher in us school )

हेही वाचा: Yogesh Kadam Accident : अपघातप्रकरणी रामदास कदम यांना घातपाताचा संशय; अनिल परबांचं नाव घेऊन म्हणाले...

स्थानिक पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्र्यू यांनी सांगितलं की, "गोळीबार करणारा मुलगा सहा वर्षांचा विद्यार्थी आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित शिक्षिका ३० वर्षांची असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

शहरातील शाळांचे अधीक्षक जॉर्ज पार्कर म्हणाले, या घटनेमुळे मला धक्का बसला असून मी निराश झालो आहे. बंदुका मुलांच्या हातात येऊ नयेत यासाठी सार्वजनिक प्रयत्नांची गरज आहे.

हेही वाचा: Online Food : ऑनलाईन मागवलेली बिर्याणी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू; मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

गेल्या वर्षी मे महिन्यात टेक्सासमधील उवाल्डे येथे एका १८ वर्षीय बंदुकधाऱ्याने १९ मुले आणि दोन शिक्षकांची हत्या केली होती. गन व्हायलन्स आर्काइव्ह डेटाबेसनुसार, गेल्या वर्षी अमेरिकेत बंदुकीशी संबंधित अंदाजे ४४,००० मृत्यू झाले होते. त्यापैकी जवळपास निम्मे खून, अपघात आणि स्वसंरक्षणाच्या घटना होत्या आणि निम्म्या आत्महत्या होत्या.

टॅग्स :america