6 वर्षांच्या मुलानं जोरबैठका काढून आईबाबांना मिळवून दिलं घर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

सध्या घर घेणं हे खूप कठीण काम झालं आहे. त्यासाठी कायकाय करावं लागतं हे घर घेऊन पाहणाऱ्यालाच माहीत असतं. पण एका लहानग्याने जोरबैठका काढून आपल्या कुटुंबासाठी घर मिळवलं आहे. जोरबैठका काढून असं महागडं बक्षीस मिळवण्याचा विक्रम करणारा तो रशियामधला दुसरा मुलगा आहे.

मॉस्को : सध्या घर घेणं हे खूप कठीण काम झालं आहे. त्यासाठी कायकाय करावं लागतं हे घर घेऊन पाहणाऱ्यालाच माहीत असतं. पण एका लहानग्याने जोरबैठका काढून आपल्या कुटुंबासाठी घर मिळवलं आहे. जोरबैठका काढून असं महागडं बक्षीस मिळवण्याचा विक्रम करणारा तो रशियामधला दुसरा मुलगा आहे.

इब्राहीम लॅनोव्ह या रशियामधल्या मुलाने 3 हजार 270 जोरबैठका काढण्याचा विक्रम केला आणि एक अपार्टमेंट बक्षीस म्हणून मिळवली. एवढ्या जोरबैठका तर फिटनेस तज्ज्ञही काढू शकत नाहीत पण इब्राहीमने त्यांचं रेकॉर्ड मोडलं.

या मुलाचा जोरबैठकांचा हा विक्रम रशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला आहे. त्याने हा विक्रम नोंदवल्यानंतर त्याला एका स्थानिक स्पोर्टस क्लबमध्ये घर देण्यात आलं. याच ठिकाणी इब्राहीमने त्याच्या वडिलांसोबत जाऊन जोरबैठका काढण्याचा सराव केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 year old breaks pushup record in Russia

टॅग्स