PAN Card: तुमचं पॅनकार्ड खरं आहे की खोटे कसं ओळखायचं? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PAN Card
PAN Card: तुमचं पॅनकार्ड खरं आहे की खोटे कसं ओळखायचं? जाणून घ्या

PAN Card: तुमचं पॅनकार्ड खरं आहे की खोटे कसं ओळखायचं? जाणून घ्या

पॅनकार्ड (Pan card) हे अतिशय महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पॅनकार्ड वापरले जाते. काहीवेळा आपल्याला खऱ्या किंवा बनावट पॅनकार्डमध्ये (Pan card Original or Fake) फरक ओळखता येत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती पॅनकार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेऊ शकते. वास्तविक, पॅनकार्डवर बनवलेला QR कोड (क्विक रिस्पॉन्स कोड) तुम्हाला या कामात मदत करतो.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त पॅनकार्ड आणि स्मार्टफोनची गरज आहे. लक्षात ठेवा स्मार्टफोनचा कॅमेरा किमान 12-मेगापिक्सेलचा असावा. याशिवाय तुम्हाला आयकर विभागाचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर अ‍ॅपद्वारे पॅनकार्ड स्कॅन करून ते खरे आहे की बनावट हे तुम्ही शोधू शकता.

हेही वाचा: SMS द्वारे करा पॅनकार्ड आधारशी लिंक!

पॅनकार्ड खरं आहे की बनावट हे कसे ओळखायचं? (How to recognize your PAN card is Original or Fake?)-

Step 1: तुमच्या स्मार्टफोनवरील 'प्ले स्टोअर' वर जा आणि 'पॅन क्यूआर कोड रीडर('PAN QR Code Reader)' शोधा.

Step 2: अ‍ॅप डाउनलोड करा, जे NSDL ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (NSDL e-Governance Infrastructure Limited) विकसित केले आहे.

Step 3: एकदा तुम्ही 'PAN QR Code Reader App' अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर ते उघडा.

Step 4: अ‍ॅप लोड झाल्यानंतर, तुम्हाला कॅमेरा (Camera) व्ह्यूफाइंडरवर हिरव्या रंगातील प्लस-सारखं ग्राफिक दिसेल.

हेही वाचा: 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच बनवता येणार पॅनकार्ड!

Step 5: कॅमेरा ऑन करून पॅनकार्डचा QR कोड स्कॅन (Scan) करा.

Step 6: QR कोड स्कॅन होताच, तुम्हाला फोनमधील बीप आवाज आणि कंपन जाणवेल.

Step 7: यानंतर पॅन कार्ड तपशील दिसेल. अ‍ॅपमध्ये दाखवलेले तपशील कार्डशी जुळतात का ते तपासा. जर ते थोडे वेगळे असेल तर पॅनकार्ड बनावट आहे.

Step 8: तुमच्या स्वतःच्या पॅनकार्डमध्ये वेगळी माहिती दिसल्यास, तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवरून नवीन पॅनकार्ड घ्यावे लागेल.