अबब! पाकिस्तानमध्ये 60 वर्षाचा वृद्ध राहिला गरोदर...

वृत्तसंस्था
Wednesday, 22 April 2020

पाकिस्तानमध्ये एक आश्चर्याची गोष्ट घडली असून, एक 60 वर्षाचा वृद्ध गरोदर राहिला आहे. पण, तो खराखुरा गरोदर नसून, रुग्णालयाच्या एका चुकीच्या अहवालामुळे गरोदर असल्याचे सांगण्यात आले.

इस्लामाबाद (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये एक आश्चर्याची गोष्ट घडली असून, एक 60 वर्षाचा वृद्ध गरोदर राहिला आहे. पण, तो खराखुरा गरोदर नसून, रुग्णालयाच्या एका चुकीच्या अहवालामुळे गरोदर असल्याचे सांगण्यात आले. पण, या घटनेमुळे हॉस्पिटलची नाचक्की झाली असून, रुग्णालय बंद करण्यात आले आहे.

तळीरामाने बंद हॉटेलमध्ये केला 'असा' प्रताप...

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये ही घटना घडली आहे. अल्ला बिट्टा नावाची व्यक्ती खानेवालच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. रुग्णालयाने लघवीची चाचणी करण्यास सांगितले. यामुळे तो खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी गेला होता. पण, अहवाल पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. अहवालामध्ये वृद्ध गरोदर असल्याचे दाखवले होते. पण, डॉक्टरांना याबाबत संशय आला. तोपर्यंत प्रकरण पाकिस्तानच्या आरोग्य खात्याकडे गेले. खानेवालच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॅबलाच टाळे ठोकले आहे. शिवाय, लॅबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

लॅबची चौकशी सुरू केल्यानंतर ही लॅब अनधिकृत असल्याचे उघड झाले. शिवाय, लॅबमध्ये कोणताही डॉक्टर काम करत नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून ही लॅब सुरू होती. हजारो रुग्णांनी या लॅबमधून तपासणी करून घेतली आहे. याप्रकरणी माहिती सोशल मीडियावरून समजल्यानंतर नेटिझन्सनी सरकारला जबाबदार धरले आहे.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 year old man got pregnant shocked after pakistans lab reoprt