गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

वृत्तसंस्था
Tuesday, 21 April 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्याच्यावर अद्यापही सुरक्षित आणि प्रभावी अशी लस आणि औषध उपलब्ध नाही. पण, कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण आहे तो प्लाझ्मा थेरेपीचा. भारतात कोरोना रुग्णावरील पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी ठरली आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्याच्यावर अद्यापही सुरक्षित आणि प्रभावी अशी लस आणि औषध उपलब्ध नाही. पण, कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण आहे तो प्लाझ्मा थेरेपीचा. भारतात कोरोना रुग्णावरील पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी ठरली आहे.

एका टेरेसवरून दुसऱया टेरेसवर; पाहा फटकेबाजी...

दिल्लीतील एका खासगी रुग्णालातील 49 वर्षीय गंभीर कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर 4 दिवसांतच या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मॅक्स हॉस्पिटलमधील रुग्णाला सोमवारी वेंटिलेटरवरून हटवण्यात आले आहे. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या रुग्णालयात एकाच कुटुंबातील अनेक कोरोना रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघं वेंटिलेटरवर होते. वेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या रुग्णावर प्लाझ्मा थेरेपी सुरू करण्यात आली.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर याच पद्धतीने उपचार करण्यात आले. 5 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामध्ये 3 भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. ह्युस्टनमधील बेलर सेंट ल्युक मेडिकल सेंटरमध्ये 5 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकारकडे प्लाझ्मा थेरेपीने कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

लॉकडाऊनमुळे चिमुकली 100 किमी चालली अन्...

प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?
डॉक्टरांनी सांगितले की, जो रुग्ण तीन आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्याच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतले जातात. कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा वापरले जातात.

प्लाझ्मा थेरेपीला सरकारकडून परवानगी मिळाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरून त्यांना वाचवता येईल. मात्र, त्यासाठी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी रक्तदान करणे गरजेचे आहे, असे एम्स रुग्णालयातील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india coronavirus patient treated with plasma therepy show positive result at delhi max healthcare