
ऐकावे ते नवलचं ! तब्बल 90 वेळा घेतले कोरोना व्हॅक्सिन
ईस्ट जर्मनीतील एका व्यक्तीने बनावट लसीकरणाचे पास विकण्यासाठी तब्बल ९० वेळा कोविड १९ चे इंजेक्शन(COVID 19 Vaccine) घेतले आहे. त्याने इलेवबर्ग येथील कोविड सेंटरवर कोविडचं इंजेक्शन घेतलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही व्यक्ती पुन्हा रांगेत उभी असल्याचं दिसल्यानंतर शंका आल्याने पोलिसांनी त्याची विचारणा केली असता हा सगळा प्रकार लक्षात आला.
एवढंच नाही तर त्याच्याकडे बनावट पास देखील होते. पोलिसांनी बनावट पास जप्त केले आहेत. जर्मन माध्यम डिपीए ने दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीत अनेकजण कोविड व्हॅक्सिन घेण्यास तयार होत नाहीएत. पण गेल्या २ आठवड्यात जर्मनीत मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या केसेस वाढल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी देखील तुम्हाला लसीकरण केल्याचे कार्ड दाखवावे लागते. हा व्यक्ती अशाच लोकांना बनावट पास पुरवत असल्याचं समोर आलंय.
हेही वाचा: शरद पवार-PM मोदींच्या भेटीसंदर्भात अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले..
या व्यक्तीने तब्बव ९० वेळा व्हॅक्सिन घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे कोविड व्हॅक्सिन या व्यक्तीने घेतले आहेत. इतक्या वेळा व्हॅक्सिन घेतल्याने या ६० वर्षीय व्यक्तीवर काय परिणाम झालाय, याबद्दल अजुन अभ्यास झालेला नाही. लसीकरण झाल्याचे पास पुरवताना या व्यक्तीने ९० वेळा कोविडची लस घेतली. जर्मनीत शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाहतूक तसंचं फिल्म थिएटर या सर्व ठिकाणी लसीकरणाचे पास दाखवणं बंधनकारक आहे.
जर्मन शिक्षक आसोसिएशनचे अध्यक्ष हेंझ-पीटर मेडींगर यांनी डिपीएशी बोलताना सांगितलं, सध्या शाळांमध्ये जी मुलं मास्क वापरत आहेत. त्यांना इतर मुलं अतिकाळजी घेणारे म्हणून चिडवताना दिसताय. पण आम्ही शिक्षकांनाच विनंती केली आहे, जेणेकरुन ते मुलांना मास्क वापरण बंधनकारक करतील. सध्या जर्मनीत ओमिक्रॉनच्या बी ए.2 व्हेरियंटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढलाय.
Web Title: 60 Years Old Taken 90 Covid Vaccine Jab
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..