
लिबियातील समुद्रकिनाऱ्यावर प्रवाशांनी भरलेली बोट उलटली आहे. या बोटीत एकूण ६५ प्रवासी होते. यातील बहुतेक प्रवासी पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही सोमवारी इस्लामाबादमध्ये या अपघाताची पुष्टी केली. यातील सर्व प्रवासी मृत पावल्याची शंका वर्तवण्यात येत आहे.