esakal | चीनमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू; पाच गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

Cylinder Explosion

अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक पोलीस मध्यरात्री डालियान शहरात दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केलीय.

चीनमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू; पाच गंभीर

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

ईशान्य चीनमधील (China) एका इमारतीत गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे (Gas cylinder leakage) शनिवारी झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झालाय. याबाबत राज्य वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या वृत्तानुसार, डालियान (Dalian) शहरात आग लागल्यानंतर यात पाच लोक जखमीही झाले आहेत. त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुलंदियन जिल्ह्यात (Pulandian District) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडालीय.

या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक पोलीस मध्यरात्री डालियान शहरात दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केलीय. पहाटे 2.30 वाजता ही आग आटोक्यात आणण्यात दलाला यश आलंय. ‘शिन्हुआ’ने दिलेल्या वृत्तानुसार, आत्तापर्यंत या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान इमारतीत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढत असल्याचे समजते.

हेही वाचा: भळभळती जखम! दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण

यापूर्वीही चीनमध्ये 'गॅस स्फोट'

यापूर्वी जून महिन्यात मध्य चीनमधील एका निवासी भागात झालेल्या गॅस स्फोटच्या दुर्घटनेत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. हा स्फोट इतका मोठा होता, की यात 100 हून अधिकजण गंभीर जखमी झाले होते. हुबेई प्रांताच्या झांगवान जिल्ह्यातील शियान शहरात सकाळी 6.30 च्या सुमारास हा स्फोट झाला होता.

loading image
go to top