Tsunami alerts issued for Japan, US, Hawaii, and Pacific Islands: बुधवारी रशियाच्या सुदूर पूर्वेतील कमचटका द्वीपकल्पात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, या भागातील इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी आली असून, इतर चार देशांनाही सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.