esakal | Iraq : कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; भीषण आगीत 82 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

iraq fire

इराकची राजधानी बगदादमध्ये कोरोना रुग्णांचा उपचार सुरु असणाऱ्या हॉस्पिटलला आग लागली. ऑक्सिजन सिलिंडर फुटल्याने ही भयानक आग लागली असल्याचे सांगितले जाते. धक्कादायक म्हणजे या अग्नितांडवात 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 110 जण जखमी झाले आहेत.

Iraq : कोविड रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; 82 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
टीम ई सकाळ

बगदाद- इराकची राजधानी बगदादमध्ये कोरोना रुग्णांचा उपचार सुरु असणाऱ्या हॉस्पिटलला आग लागली. ऑक्सिजन सिलिंडर फुटल्याने ही भयानक आग लागली असल्याचे सांगितले जाते. धक्कादायक म्हणजे या अग्नितांडवात 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 110 जण जखमी झाले आहेत. इराकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने इब्न अल-खातिब हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले आणि अनेक रुग्णांना बाहेर काढण्यात आले. पण, हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यांना या आगीपासून वाचवता आले नाही.

इराकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये ठिकठिकाणी जळलेले मृतदेह पडले होते. पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांनी बगदाद आरोग्य विभागात उल-रुसफा क्षेत्रात नियुक्त असलेले महानिर्देशक आणि हॉस्पिटल निर्देशक यांना पदावरुन काढून टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, आगीच्या घटनेनंतर पंतप्रधानांनी बगदादमध्ये आपात्कलीन बैठक घेतली. यात इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनीही भाग घेतला होता.

हेही वाचा: पाकिस्तान ते अमेरिका; कोरोना संकटात अनेक देश भारताच्या मदतीला

पंतप्रधानांनी सांगितलं की, निष्काळजीपणामुळे हा अग्नितांडव झाला आहे. निष्काळजीपणा चुकी असू शकत नाही, तर तो अपराध आहे आणि त्यासाठी सर्वजण जबाबदार आहेत. कादिमी यांनी अधिकाऱ्यांना 24 तासांच्या आत रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं आहे. इराकमधील संयुक्त राष्ट्रचे राजदूत जेनिन हेनिस प्लेसकार्ट यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. दरम्यान, इराकमध्ये दररोज कोरोनाचे 8 हजार रुग्ण आढळून येत आहेत.