श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या 9 नागरिकांना अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 एप्रिल 2019

- श्रीलंकेतील या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने यापूर्वीच स्वीकारली

नवी दिल्ली : श्रीलंकेतील कोलंबो येथे मागील रविवारी (ता.21) दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुमारे 350 हून अधिक नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर आता या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या 9 नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका बॉम्बस्फोटाने हादरली. या बॉम्बस्फोटात अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीलंकन सरकारकडून याबाबत चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान काही माहिती समोर येत आहे. याच माहितीच्या आधारे पाकिस्तानातील 9 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच श्रीलंकेच्या हल्ल्यात एका महिलेचाही समावेश होता.

दरम्यान, श्रीलंकेतील या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने यापूर्वीच स्वीकारली असून, त्याचदृष्टीने तपास केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 Pak Citizens Arrested Due to Colombo Terrorist Attack