इंडोनेशियात चर्चवरील बॉम्ब हल्ल्यात 9 जणांचा बळी

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

जकार्ता ः इंडोनेशियातील सुराबाया या शहरातील तीन चर्चमध्ये आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात 9 जणांना आपला जिव गमवावा लागला असून, 40 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुराबाया हे इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे.

महत्त्वाची बाब अशी दोन आठवड्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

इंडोनेशिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील अल्पसंख्याक धार्मिक समुदायाला निशाना साधत हा हल्ला करण्यात आला आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे.

ईस्ट जावाचे पोलिस प्रवक्ता फ्रांस बरुंग मनगेरा म्हणाले, ''हल्लेखोरांनकडून तीन चर्चवर तीन हल्ले करण्यात आले आहेत. सकाळी साडेसात वाजता पहिला हल्ला झाला. त्यानंतर पुढील दहा मिनीटात आणखी दोन हल्ले झाले. पोलिसांनी केवळ सांता मारिया कैथलिक चर्चवर झालेल्या हल्लाचीच माहिती दिली आहे. आजूनपर्यंत तरी या हल्लाची जबाबदारी कोणीही स्विकारली नाही.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 people killed in bomb attack in Indonesia