esakal | एकाचवेळी दोन व्हेरियंटचा संसर्ग; पाच दिवसांत रुग्णाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना

एकाचवेळी दोन व्हेरियंटचा संसर्ग; पाच दिवसांत रुग्णाचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मागील दी वर्षांपासून कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवनवीन व्हेरियंट आणि धोके पाहायला मिळत आहेत. अल्फा, बीटा, डेल्टा यासारखे विविध कोरोना व्हिरेयंट आढळून आले आहेत. मात्र बेल्जियममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेच्या शरीरात एकाचवेळी दोन कोरोना व्हेरियंट आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेचा पाच दिवसांत मृत्यू झाला आहे.

एकाचवेळी शरीरात दोन व्हेरियंट आढळल्यानंतर शास्त्रज्ञांची चिंता वाढली तर कोरोनाचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेल्जियममधील 90 वर्षीय महिलेला डबल इन्फेक्शन (दुहेरी संसर्ग) झाल्यानंतर तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. दोन वेगवेगळ्या लोकांमुळं या महिलेलं असं डबल इन्फेक्शन झालं असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळलेल्या अल्फा आणि बीटा प्रकारातील विषाणूची लागण या महिलेला झाली होती. बेल्जियममध्ये मार्च 2021 मध्ये मृत्यू झालेल्या या महिलेचं लसीकरण झालं नव्हतं.

हेही वाचा: सेल्फी जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू, 16 जखमी

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 90 वर्षीय महिला घरीच कोरोनावर उपचार घेत होती. तिच्या शरीरात एकाचवेळी अल्फा आणि बीटा व्हेरीयंट आढळून आले. या महिलेनं कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. प्रकृती बिघडल्यानंतर तिला महिन्यात ओएलवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारावेळी पाच दिवसांत तिचा मृत्यू झाला.

loading image