esakal | सेल्फी जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू, 16 जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

सेल्फी जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू, 16 जखमी

सेल्फी जिवाशी; वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू, 16 जखमी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

रविवारी राजस्थानमध्ये वीज कोसळल्यामुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ११ जणांचा मृत्यू हा एकट्या जयपूरमध्ये झाला आहे. जयपूर, ढोलपूर, कोट्टा आणि जहालवार जिल्ह्यांमध्ये काल मान्सूनचं दमदार आगमन झालं. यावेळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. राजस्थानमध्ये वेगवगळ्या भागांमध्ये वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये 16 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमेर महलाजवळील वॉच टॉवरवर वीज कोसळली आहे. येथे पावसात सेल्फीसाठी जाणाऱ्या 11 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. वॉच टॉवरवर सेल्फी घेत असताना विजेचा जोरदार धक्का बसला, त्यावेळी सेल्फीसाठी वरती गेलेले पर्यटक खाली कोसळले. जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव म्हणाले, अकरा जणांचा मृत्यू आणि 16 जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, अन्य जखमींच्या शोधार्थ बचावकार्य सुरू आहे.

हेही वाचा: Video : भाजप कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारल्याचा पोलिसाचा आरोप

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये विविध ठिकाणी वीज कोसळल्यामुळे 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये विविध घटनांमध्ये वीज पडून 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थानमध्ये 20 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार मध्य प्रदेशमध्येही वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि राज्यपाल कलराज मिश्रा यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मृताच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. गहलोत यांनी ट्विट केले की, “कोटा, धोलपूर, झालावाड़, जयपूर आणि बारान येथे वीज कोसळल्यामुळे जीवितहानी झालेली आहे. ते म्हणाले की, पीडित कुटुंबियांना तातडीने मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी ट्विट करत आपलं दु:ख व्यक्त केलं.

loading image