अन् 33 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाला मिळाली आई! Mother Son Reunited After 33 Years | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mother Son Reunited After 33 Years
अन् 33 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाला मिळाली आई! Mother Son Reunited After 33 Years

अन् 33 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाला मिळाली आई!

चीनमधली ही गोष्ट आहे. ली जिंगवेई हा चार वर्षांचा असताना त्याला त्याच्या घरातून पळवून नेण्यात आले (Lured Away)आणि लहान मुलांची तस्करी करणाऱ्या रिंगमध्ये (Child Trafficking Ring) विकले गेले होते. गेल्यावर्षी 24 डिसेंबर रोजी त्याने व्हिडिओ शेअरिंग अॅप Douyin वर हाताने काढलेला नकाशा शेअर केला, तो पोलिसांनी बघितला. आणि त्यावरून शोध घेत एका लहान गावापर्यंत पोलिस पोहोचले. त्या गावातील एका महिलेचा मुलगा गायब झाला होता. दोघांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यात तो या गावाचाच आहे. असे लक्षात आले. त्यानंतर ते शनिवारी युनान प्रांतात त्यांची पुर्नभेट झाली. तो क्षण या दोघानी मनात साठवला असेल. तीन दशकांनंतर पहिल्यांदाच या जोडीची भेट झाली. ली जिंगवेईने आईला मिठी मारण्यापूर्वी आईचा मास्क काळजीपूर्वक काढून टाकला. दोघांच्या अश्रूचा बांध फूटला. त्यांनी ही भेट घडवून आणणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.

हेही वाचा: Biggest Forest: ही जंगले नाहीत पृथ्वीची फुप्फुसं आहेत!

Drawing by Li Jingwei

Drawing by Li Jingwei

अशी घडली घटना

ली जिंगवेईचे 1989 मध्ये युनान प्रांतातील नैऋत्य दिशेला असणाऱ्या झाओटोंग या शहराजवळून अपहरण करण्यात आले. त्याला 1,800 किमी दूर राहणाऱ्या कुटुंबाला विकले गेले. ली दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात राहत होता, त्याला त्याच्या दत्तक पालकांकडून तो इथे कसा आला, याबद्दल नीट माहिती मिळाली नाही. डीएनए चाचणी करण्यासही त्यांनी नकार दिला. त्यामुळे तो इंटरनेटकडे वळला. त्याने तेथे व्हिडिओ शेअर केला. त्यात लिहिले, मी माझे घर शोधत आहे. 1989 च्या सुमारास एका टक्कल पडलेल्या शेजाऱ्याने मला हेनान येथे नेले. मी चार वर्षांचा होतो. माझे अपहरण झाले. हा माझ्या घराच्या परिसराचा नकाशा आहे जो मी मला त्यावेळी जितके आवठत होते त्यावरून काढला आहे," यात शाळा, बांबूचे जंगल आणि एक लहान तलाव यांचा समावेश आहे. या वर्णनावरून पोलिसांनी त्या मुलाच्या पालकांचा शोध घेतला.

हेही वाचा: WHO प्रमुख म्हणतात; '२०२२मध्येच कोरोनाचा खात्मा होईल, मात्र एका अटीवर…'

मुलांचे अपहरण सामान्य बाब

चीनमध्ये अनेक मुलांचे लहान वयात अपहरण केले जाते. त्यांना इतर कुटुंबांना विकले जाते. 2015 मध्ये दरवर्षी 20,000 मुलांचे अपहरण झाल्याचा अंदाज आहे. 2021 मध्ये अनेक मुलं त्यांच्या जन्मदात्या पालकांकडे पुन्हा आल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हेही वाचा: रशिया युक्रेनवर कब्जा करणार काय ?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top