Thailand Boat: अन् थायलंडच्या समुद्रात लोकांनी अचानक उड्या मारायला सुरूवात केली... गोष्ट 105 जणांच्या जीवाची

Ko Tao Island: हे जहाज सुरत थानी प्रांतातून थाई किनाऱ्यावरील लोकप्रिय पर्यटन स्थळ कोह ताओला जात होती. तेवढ्यात एका प्रवाशाने जे काही पाहिले त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला.
Fire broke out on a tourist boat near koh tao island Thailand
Fire broke out on a tourist boat near koh tao island ThailandEsakal

थायलंडच्या आखातातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गुरुवारी एका जहाजाला भीषण आग लागली. या भीषण आगीपासून बचाव करण्यासाठी घाबरलेल्या प्रवाशांनी थेट समुद्रात उड्या मारायला सुरूवात केली. पण या अपघातातून जहाजावरील सर्व 108 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

हे जहाज सुरत थानी प्रांतातून थाई किनाऱ्यावरील लोकप्रिय पर्यटन स्थळ कोह ताओला जात होती. तेवढ्यात एका प्रवाशाला अचानक मोठा आवाज आणि धुराचा वास आला.

या जहाजातील प्रवाशी मैत्री प्रॉमजम्पा यांनी सांगितले की, त्याला धूर आणि आग दिसली तेव्हा त्याच्यासह इतर प्रवाशींनी आरडाओरडा करत अलार्म वाजवला.

प्रवासी प्रोमजम्पा यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, "आम्हाला वेळेत लाइफ जॅकेट मिळू शकले नाही. हे खूप भीतीदायक होते. लोक रडत होते... माझ्या डोळ्यातही अश्रू आले होते."

थायलंडमधील सूरत थानी प्रांताच्या (Surat Thani) अधिकाऱ्यांनी फेसबुकवर सांगितले की, 108 जणांपैकी या जहाजात बसलेले ९७ जण सूरत थानीचे होते.

Fire broke out on a tourist boat near koh tao island Thailand
Gold Toilet: सोन्याचं 'टॉयलेट' चोरणारा अखेर ताब्यात; किंमत ऐकून व्हाल चकित

सूरत थानी प्रांताच्या सरकारच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, या अपघातातून सर्वांना वाचवण्यात आले असून, कोणतीही दुखापत झालेली नाही.

दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जहाजाच्या इंजिनमधून आग लागली. आगीमागचे कारण तपासले जात आहे.

Fire broke out on a tourist boat near koh tao island Thailand
POK: व्याप्त काश्मीर घटनात्मकदृष्ट्या पाकिस्तानचा भाग नाही, अवामी अ‍ॅक्शन कमिटी UN मध्ये जाण्याच्या तयारीत

लोकप्रिय पर्यटन स्थळ कोह ताओ

कोह ताओ, याचा अर्थ "टर्टल आयलंड" असा होतो. हे थायलंडमधील एक बेट आहे आणि थायलंडच्या आखाताच्या पश्चिम किनाऱ्यावरील चुम्फॉन द्वीपसमूहाचा एक भाग आहे.

बेटाची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर, विशेषत: स्कूबा डायव्हिंगवर आधारीत आहे. स्पष्ट दृश्यमानता, परवडणाऱ्या किमती, उबदार पाणी आणि सागरी जीवसृष्टीची वैविध्यता यामुळे कोह ताओमध्ये स्कूबा डायव्हिंग अत्यंत लोकप्रिय आहे.

हे बेट हॉक्सबिल आणि हिरव्या कासवांसाठी एक महत्त्वाचे प्रजनन स्थळ आहे. पर्यटनाच्या विकासामुळे या कासवांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे, परंतु 2004 मध्ये KT-DOC, रॉयल थाई नेव्ही आणि स्थानिक स्कूबा डायव्हिंग केंद्रांच्या पुढाकाराने प्रजनन कार्यक्रमाद्वारे शेकडो लहाण कासवांना पुन्हा बेटाच्या पर्यावरणात आणले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com