Google कडून भारताची संस्कृती दाखवत बनवले खास Doodle! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Doodle

Google कडून भारताची संस्कृती दाखवत बनवले खास Doodle!

Independence Day 2022 : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, गुगलनेही हा दिवस खास अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने आकर्षक असे डूडल (Doodle) बनवले आहे. यामध्ये रंगीबेरंगी पतंग मुक्तपणे उडवताना दाखवण्यात आले आहेत. हे उडणारे पतंग म्हणजे भारताने आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या उंचीचे प्रतीक दर्शवित आहेत.

हेही वाचा: Independence Day Special: भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील १० महत्वाच्या गोष्टी

हे डूडल गुगलने GIF मध्ये तयार केले.

केरळची कलाकार नीतीने हे डूडल तयार केले आहे, ज्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरे करताना दाखवण्यात आले आहे. या खास प्रसंगी गुगलने एक GIF तयार केले आहे. स्वातंत्र्य दिन 2022 च्या डूडलमध्ये पतंगांच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीचे चित्रण करण्यात आले आहे. हे Google डूडल 75 वर्षातील भारताच्या महान उंचीचे प्रतीक आहे. गुगलने तिरंग्याचे तीन प्रमुख रंग (भगवा, पांढरा आणि हिरवा) वापरण्यासह 15 ऑगस्ट रोजी भारतात घडणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. पतंग उडवल्यासारखे. डूडलमध्ये उगवणारा सूर्य. पहाटे सूर्याच्या नवीन किरणांमध्ये हिरवाईत पतंग बनवणारी एक स्त्री आणि तिच्याभोवती पतंग उडवणारी काही मुलं दिसत आहेत.

हेही वाचा: Independence Day: अंतराळवीराने अंतराळातून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या दिल्या शुभेच्छा

पतंग उडवणे ही एक जुनी परंपरा डूडलबद्दल तिचे मत शेअर करताना, कलाकार नीती म्हणाली की, भारतात पतंग उडवणे ही एक जुनी परंपरा आहे. ही परंपरा देखील भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. नीती म्हणाली की, स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक ब्रिटीश राजवटीविरुद्ध घोषणा लिहिण्यासाठी पतंगाचा वापर केला जात असे. निषेधाचे चिन्ह म्हणून ते आकाशात उडवले जात असे.