Elon Musk ची नवी घोषणा; ...ब्लू टिक काढून टाकणार!

एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच कंपनीत अनेक बदल सुरू केले आहेत.
Elon Musk
Elon Musk esakal
Updated on

एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच कंपनीत अनेक बदल सुरू केले आहेत. ट्विटरनं आपली सशुल्क ब्लू टिक्स सेवा सुरू केलीय. दरम्यान मस्क यांनी ब्लू टिक्ससंदर्भात नवीन घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमध्ये अनेकजणांचे अकाऊंट सस्पेंड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (A warning on Twitter parody as account of user impersonating Elon Musk is suspended )

सोमवारी म्हणजे आज सकाळी एलन मस्क यांनी एक ट्विट करत आपल्या युजर्सला नवी अपडेट दिली आहे. आपली ओळख बदलणारे प्रत्येक अकाउंट सस्पेंड केले जाईल. पॅरोडी अकाउंट असल्यास ते पॅरोडी अकाउंट आहे असे स्पष्टपणे लिहावे, अन्यथा कोणाचे नाव किंवा फोटो वापरणारे अकाउंट सस्पेंड केले जाईल.

Elon Musk
Twitter ची सशुल्क Blue Tick सेवा सुरू; अमेरिकेसह 'या' देशांत लागू होणार सुविधा, भारतात कधी?

आम्ही अकाउंट सस्पेंड करण्यापूर्वी एक चेतावणी दिली होती, परंतु आता आम्ही व्यापक पडताळणी सुरू करत आहोत. त्यानुसार, कोणतीही चेतावणी दिली जाणार नाही आणि अकाउंट थेट सस्पेंड केले जाईल. तसेच ट्विटर ब्लूवर साइन अप करण्याची अट म्हणून हे स्पष्टपणे ओळखले जाईल असे एलन मस्क यांनी म्हटले आहे.

...तर ब्लू टिक्स होणार गायब

जर कोणी ट्विटर युजरनेम बदलले तर त्याचे ब्लू टिक तात्पुरते काढून टाकले जाईल, असेही एलन मस्क यांनी म्हटले आहे. दरम्यान, अलीकडे असे देखील दिसून आले आहे की, अनेक अकाउंट सस्पेंड केली गेली आहेत, जी दुसऱ्याचे पॅरोडी अकाउंट म्हणून काम करत आहेत. खरंतर, इलॉन मस्क यांच्या नावानेही अनेक ट्विटर अकाउंट्स सुरू होती, जी सतत सस्पेंड केली जात आहेत.

एलन मस्क यांचे बनावट अकाऊंट

एक पॅरोडी अकाउंट एलन मस्क यांच्या नावाने हिंदी भाषेतही चालू होते. ते अकाउंट इयान वूलफोर्डचे होते, हे अकाउंट देखील सस्पेंड करण्यात आले आहे.

इयान वुलफोर्ड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून एलन मस्क ठेवले होते आणि प्रोफाइल आणि कलर फोटो देखील मस्क यांचा वापरला होता. त्याचे अकाउंट व्हेरिफाय झाल्यापासून अनेकांना एलन मस्क यांचे अकाउंट हॅक झाल्याचे वाटत होते.

इयान वूलफोर्ड हे सतत इलॉन मस्क यांच्या नावाने ट्विट करत होते, त्यानंतर त्यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. इयान वूलफोर्ड यांनी इलॉन मस्क यांच्या नावाने हिंदी आणि भोजपुरी अशा दोन्ही भाषेत अनेक ट्विट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com