Twitter ची सशुल्क Blue Tick सेवा सुरू; अमेरिकेसह 'या' देशांत लागू होणार सुविधा, भारतात कधी?

इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच कंपनीत अनेक बदल सुरू केले आहेत.
Elon Musk Twitter Deal
Elon Musk Twitter Dealesakal
Summary

इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच कंपनीत अनेक बदल सुरू केले आहेत.

Elon Musk Twitter Deal : इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर खरेदी करताच कंपनीत अनेक बदल सुरू केले आहेत. ट्विटरनं (Twitter) आपली सशुल्क ब्लू टिक्स सेवा (Blue Tick Service) सुरू केलीय. शनिवारी रात्री उशिरा iOS प्लॅटफॉर्मवर याबाबत सूचना पाठवण्यात आल्या आहेत. यानुसार, दरमहा 8 डॉलर भरून त्याची प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा (Premium Subscription Service) ट्विटर युजर घेऊ शकतील.

Elon Musk Twitter Deal
आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, म्हणून आमच्या घरावर छापे टाकले जाताहेत; काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप

ट्विटरची सूत्रं हाती घेताच, इलॉन मस्कनं सशुल्क ब्लू टिक्स सेवेवर जोर देण्यास सुरुवात केली. सध्या ही सेवा केवळ निवडक देशांमध्ये सुरू करण्यात आलीय. भारतात ही सेवा कधी सुरू होईल याची माहिती सध्या उपलब्ध नाहीय. त्यामुळं आता महिन्याला 8 डॉलर भरणाऱ्यालाच ट्विटरकडून ब्लू टिक मिळू शकणार आहे. याशिवाय, या सेवेचा लाभ घेणाऱ्यांना इतर ट्विटर युजर्सच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील. या सशुल्क सेवेचा लाभ घेणाऱ्यांना मोठे व्हिडिओ पोस्ट करू शकणार आहेत.

Elon Musk Twitter Deal
मी काहीच ऐकणार नाही, निवडणुकीतून माघार घ्या; PM मोदींनी स्वत: फोन करुन बंडखोराला झापलं!

सशुल्क सेवेचा लाभ घेणाऱ्याच्या वॉलवर दर्जेदार सामग्री उपलब्ध असणार आहे. घोटाळे, स्पॅम आणि बॉट्स कमी करण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरेल असा ट्विटरचा दावा आहे. सध्या ही सेवा iOS प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आलीय. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आलीय. ही सशुल्क सेवा अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर कधी सुरू होईल आणि भारतासह इतर आशियाई देशांमध्ये कधी लागू होईल याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाहीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com