मालदिवचे विद्यमान अध्यक्ष पराभूत

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

मालदिवमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना पराभूत करत विरोधीपक्षांचे उमेदवार इब्राहिम महंमद सोलीह यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, विरोधकांचे उमेदवार सोलीह हे विजयी झाल्याचे मालदिव सरकारने आज मान्य केले. भारत आणि श्रीलंकेने सोलीह यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

कोलंबो- मालदिवमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना पराभूत करत विरोधीपक्षांचे उमेदवार इब्राहिम महंमद सोलीह यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, विरोधकांचे उमेदवार सोलीह हे विजयी झाल्याचे मालदिव सरकारने आज मान्य केले. भारत आणि श्रीलंकेने सोलीह यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

मालदिवच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज घोषणा केली की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये 58.33 टक्के मते मिळवत विरोधकांचे उमेदवार सोलीह हे विजयी झाले आहेत. यामीन यांना 41.7 टक्के मते मिळाली. 

यामीन यांनी मात्र अद्याप आपल्या पराभवाबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही. देशातील जनतेचा कौल यामीन यांनी मान्य करावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज म्हटले आहे. चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी भारत उत्सूक आहे. त्यामुळे भारताकडून सर्वप्रथम सोलीह यांचे अभिनंदन करण्यात आले. 

माध्यमेही तोंडावर आपटली 
मालदिवमधील अध्यक्षीय निवडणुकीवेळी सरकारी माध्यमांनी वार्तांकनामध्ये विरोधी पक्षाला अत्यल्प स्थान दिले होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामीन यांनी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते, तसेच काही नेत्यांना विदेशात आश्रय घ्यावा लागला होता. अशा वातावरणामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेने मात्र यामीन यांच्या विरोधात कौल दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abdulla Yameen concedes defeat in Maldives presidential election