पाकचा नवा खोडसाळपणा

वृत्तसंस्था
Tuesday, 12 November 2019

भारताविरुद्ध प्रचार करून पाकिस्तान तोंडघशी पडल्याचे अनेकदा दिसले आहे. पण, तरीही भारताविरोधात कागाळ्या करण्याची संधी पाकिस्तान शोधत असतो. आता त्यांनी भारतीय हवाई दलातील वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा पुतळा कराचीमधील युद्ध संग्रहालयात उभारला आहे.

इस्लामाबाद - भारताविरुद्ध प्रचार करून पाकिस्तान तोंडघशी पडल्याचे अनेकदा दिसले आहे. पण, तरीही भारताविरोधात कागाळ्या करण्याची संधी पाकिस्तान शोधत असतो. आता त्यांनी भारतीय हवाई दलातील वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा पुतळा कराचीमधील युद्ध संग्रहालयात उभारला आहे.

अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानी हद्दीत उतरल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. पाकिस्तानच्या या ‘कामगिरी’चे प्रतीक म्हणून सैन्यदलाने अभिनंदन यांचा पुतळा उभारून भारताविरोधात पुन्हा आघाडी उघडली असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानी पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक अन्वर लोधी यांनी या पुतळ्याचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केल्याने हे कृत्य सर्वांसमोर आले. 

लोधी यांनी ट्विटरवरून पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करीत म्हटले आहे की, जर या पुतळ्याच्या हातात चहाचा कप दिला असता, तर जास्त चांगले झाले असते. याचे कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना सैन्याने त्यांचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात ते चहा पीत असल्याचे दिसले. तसेच ‘हा चहा उत्तम आहे, धन्यवाद!’ असे अभिनंदन यांनी व्हिडिओतून सांगितले होते. लोधी यांनी पोस्ट केलेल्या छायाचित्रात अभिनंदन यांच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात चहाचा कप ठेवलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhinandan wardhman statue in yuddha museum karachi