गर्भपात म्हणजे कॉन्ट्रॅक्‍ट किलर 

पीटीआय
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

वॅटिकन सिटी (पीटीआय) : गर्भपात करणे म्हणजे "कॉन्ट्रॅक्‍ट किलर' असल्याचे मत पोप फ्रान्सिस यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. वॅटिकनच्या उपासकांसमोर बोलताना पोप फ्रान्सिस म्हणाले, की गर्भपात करणे म्हणजे कोणासही नष्ट करणे होय. एखाद्या समस्येतून सुटण्यासाठी एखाद्याची हत्या करण्याचा मार्ग अवलंबणे, हे महापाप आहे. एखादी समस्या सोडविणे म्हणजे एखाद्याची हत्या करणे, असा सवाल पोप यांनी साप्ताहिक भाषणाच्या वेळी सेंट पीटर स्क्वेअर येथे श्रोत्यांसमोर केला. 

आपल्या भाषणात पोप यांनी मानवी जीवनमूल्यांच्या होणाऱ्या ऱ्हासाबद्दल खंत व्यक्त केली. या वेळी त्यांनी युद्ध, शोषण, असंस्कृती त्याचप्रमाणे गर्भपाताबद्दलची उदाहरणे दिली, एखाद्या निष्पाप आयुष्याला संपवून टाकणारा नागरिक मानव कसा असू शकतो, असा सवालही त्यांनी या वेळी बोलताना केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abortion is contract killer