'इसिस'च्या अबू बगदादीला ठार केल्याचा अमेरिकेचा पुन्हा दावा

पीटीआय
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

'इसिस' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी हा अमेरिकी सैन्याने सीरियाच्या उत्तर भागात घातलेल्या एका छाप्यादरम्यान ठार झाल्याचा दावा येथील माध्यमांनी केला आहे.

वॉशिंग्टन : "इसिस' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी हा अमेरिकी सैन्याने सीरियाच्या उत्तर भागात घातलेल्या एका छाप्यादरम्यान ठार झाल्याचा दावा येथील माध्यमांनी केला आहे. बगदादीला मारल्याचा दावा आतापर्यंत अनेक वेळा करण्यात आला आहे. 

अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, निश्‍चित माहितीच्या आधारावर अमेरिकी सैन्याने सीरियाच्या उत्तर भागातील एके ठिकाणी छापा घातला. या वेळी तेथे असलेल्या बगदादीने आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात तो ठार झाला. मृतदेहाची डीएनए चाचणी झाल्यानंतर सरकारकडून घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे.

मंडलिक प्रवृत्तीचा शिवसेनेने विचार करावा : चंद्रकांत पाटील

तसेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यातच या मोहिमेला परवानगी दिली होती. तीन वर्षांपूर्वी बहुतांश सीरियात थैमान घातलेल्या इसिसचा प्रभाव आता अत्यंत मर्यादित राहिला असून, बगदादी हा देशाच्या उत्तर भागात राहात होता. त्याला मारण्याच्या उद्देशानेच अमेरिकी सैनिकांनी येथे छापा घातला होता. छापा घालताच बगदादी आणि त्याच्या दोन बायकांनी आत्मघाती स्फोट घडवून आणला. 

स्वयंघोषित खलिफा 

कट्टर मूलतत्त्ववादी असलेला बगदादी हा मूळ इराकचा नागरिक होता. सद्दाम हुसेनचा पाडाव करण्यासाठी अमेरिकी सैन्य इराकमध्ये घुसले होते, त्या वेळी बगदादी त्यांच्याविरोधात लढला होता. त्याला अमेरिकी सैनिकांनी अटक करून इतर दहशतवाद्यांबरोबर अबू घारीब येथील तुरुंगात ठेवले होते. त्याने नंतर इराकमध्ये अल कायदामध्ये प्रवेश केला. येथील काही दहशतवाद्यांना घेऊन बगदादीने 2010 मध्ये इसिसची घोषणा केली.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांनाच विचारलं, 'सांगा काय चुकलं?'

बगदादीने 2014 मध्ये स्वत:ला खलिफा जाहीर करत इराक आणि सीरियाला खिलाफत जाहीर केले होते. त्यानंतर सुमारे अडीच ते तीन वर्षे या दोन्ही देशांत इसिसने प्रचंड हिंसाचार घडवून आणला होता. अमेरिकेने आणि मित्र देशांच्या फौजांनी लष्करी कारवाई करत इसिसची बरीच पीछेहाट केली. दरम्यानच्या काळात दोन ते तीन वेळा बगदादी मारला गेल्याचा दावा केला गेला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abu Bakr al Baghdadi IS leader killed in US operation in Syria