चंद्रकात पाटलांनी जनतेलाच विचारले, आमचं काय चुकलं?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

टोल, एलबीटी आणल्यानंतर आम्ही तो हटविला तरीही त्यांना मतदान का? आम्ही कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा सुरू केली, त्यांनी दहा वर्षे ती बंद ठेवली होती. त्यांनी शहर भकास केलं, आम्ही केएसबीपीच्या माध्यमातून ते सजवलं. आम्ही रेल्वेचं विद्युतीकरण केलं, त्यांनी रेल्वे जैसे-थे ठेवली.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्याने आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पराभवामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनतेलाच प्रश्न विचारत म्हटले आहे, की आमचं काय चुकलं.

विधानसभा निवडणुकीत भाजपला गेल्यावेळापेक्षा सुमारे 20 जागा कमी मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीने मोठी मुसंडी मारली आहे. कोल्हापुरचे असूनही चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी आम्ही एवढी कामे करूनही आम्हाला का नाकारले, याबाबत जनतेलाच विचारले आहे आमचं काय चुकलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की टोल, एलबीटी आणल्यानंतर आम्ही तो हटविला तरीही त्यांना मतदान का? आम्ही कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा सुरू केली, त्यांनी दहा वर्षे ती बंद ठेवली होती. त्यांनी शहर भकास केलं, आम्ही केएसबीपीच्या माध्यमातून ते सजवलं. आम्ही रेल्वेचं विद्युतीकरण केलं, त्यांनी रेल्वे जैसे-थे ठेवली. त्यांनी टोल आणला आम्ही टोल घालवला. त्यांनी एलबीटी आणला आम्ही एलबीटी रद्द केला. तरीही आम्हाला तुम्ही का नाकारले याबाबत आम्ही जाणून घेणार आहोत. येथील पराभवाची कारणे आम्ही शोधू. आम्ही जनतेला दोष देत नाही. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले हे आम्ही मान्य करतो. फक्त आमचा जनेतला हा प्रश्न आहे. की एवढं काम केलं. तर आम्ही आणखी काय काम करायला हवं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president Chandrakant Patil asks question about loss in vidhan Sabha election