पडद्यावरचा अवलिया बॉंड! 007

shon-konari
shon-konari

सर थॉमस शॉन कॉनरी उर्फ ज्येष्ठ स्कॉटिश सिने अभिनेते व निर्माते शॉन कॉनरी यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० ब्रिटनमधील एडिनबरो शहरात झाला. मूळचे स्कॉटलँडचे असलेले शॉन कॉनरी यांनी जेम्स बाँडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शॉन कॉनरी यांचे वडील रबर कारखान्यात रोज बारा बारा तास मजुरी करीत असत. घरी आल्यावरही त्यांचे झोपडीत काहींना काही काम चालूच असे. शॉन थोडासा मोठा झाल्यावर आपल्या आईवडिलांना कामात मदत करू लागले. या शिवाय रोज पहाटे शहरात दूध घेऊन जात असत. १६ व्या वर्षी ते नौदलात भरती झाले. 

शॉन कॉनरी यांना पहिल्या बाँडपटासाठी १६,५०० डॉलर मिळाले तर शेवटच्या जेम्स बाँड फिल्मसाठी त्यांना आठ कोटी डॉलर मिळाले! शॉन कॉनरी यांचे जेम्स बाँडवरचे सर्वच चित्रपट खूप गाजले.  शॉन कॉनरी हे प्रत्येक चित्रपटात नवं घड्याळ व नवी मोटार वापरत असत. कॉनरी यांनी १९६२ ते १९७१ या दरम्यान ‘डॉ. नो’( १९६२), फ्रॉम रशिया विथ लव्ह (१९६३), गोल्डफिंगर (१९६४), थंडरबॉल ( १९६५),  यू ओन्ली लिव्ह ट्वाईस (१९६७), डायमंडस आर फॉरेव्हर (१९७१) या बाँडपटांमध्ये नायकाची कामे केली. याशिवाय १९८३ मध्ये शॉन कॉनरी अभिनित ‘नेव्हर से नेव्हर अगेन’ हा स्वतंत्र निर्मित एक बॉंडपट झळकला होता. शॉन कॉनरीची गणना ''ए'' ग्रेड आर्टिस्टमध्ये होत असे. शॉन कॉनरीने जेम्स बाँड ००७ या चित्रपट मालिकेतील सात चित्रपट केले. नंतर तो कंटाळला. तीन वर्षांपर्यंत त्यानं एकही भूमिका स्वीकारली नाही.

निर्मात्यांनी त्याला खूप गळ घातली तरी त्याचं उत्तर एकच ''सॉरी''. तो कधीही कोणत्याही वादात सापडला नाही. तीन वर्षांनंतर त्यानं कॅरॅक्टर आर्टिस्ट म्हणून भूमिका केल्या. त्यानं एकूण ३० बोलपटात काम केलं. जगप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर स्टीवन स्पीलबर्ग शॉन कॉनरी विषयी गौरवोद्गार काढताना म्हणतात, माझ्या दृष्टिकोनातून फक्त सातच अतिशय उत्तम दर्जाचे अभिनेते आहेत. त्यात शॉन कॉनरीचा समावेश आहे. जागतिक पातळीवरचा गुप्तचर कसा असावा, हे त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्यानं दाखवून दिलं आहे. अमेरिकेत त्याचं एक मोठं फार्म हाऊस आहे. बहामा बेटावर त्याचा प्रशस्त बंगला आहे. २००० साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्याकडून त्यांचा सर हा किताब देऊन सन्मान करण्यात आला होता. त्याच्या नायकाच्या भूमिकांसाठी कॉनरीला दोनदा ऑस्कर तर ३ वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com