Earthquake : भूकंपातून तरुणाला 94 तासांनंतर काढलं ढिगाऱ्यातून बाहेर; जीव वाचवण्यासाठी पीत होता स्वत:ची लघवी!

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपात आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.
Turkey-Syria Earthquake
Turkey-Syria Earthquakeesakal
Summary

तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गझियानटेप प्रांतात बचाव पथकानं इमारतीच्या ढिगाऱ्यातून एका तरुणाला जिवंत बाहेर काढलं.

Turkey-Syria Earthquake : लागोपाठ झालेल्या भूकंपाच्या दोन मोठ्या धक्क्यांनंतरही तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के बसणं सुरूच आहे. या देशात भूकंपाचे तब्बल 39 धक्के बसले असून आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झालाय.

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपात आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. अनेक दिवस उलटून गेले तरी बचावकार्य सुरूच आहे.

अलीकडंच, तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गझियानटेप प्रांतात बचाव पथकानं इमारतीच्या ढिगाऱ्यातून एका तरुणाला जिवंत बाहेर काढलं. भूकंपानंतर 94 तासांनी त्याला बाहेर काढण्यात आलं. यादरम्यान 17 वर्षीय तरुणानं लघवी पिऊन स्वत:ला जिवंत ठेवलं.

Turkey-Syria Earthquake
Satyajeet Tambe : सत्यजित तांबेंच्या विजयानंतर नवा ट्विस्ट; भाजपच्या बड्या नेत्यानं केला मोठा गौप्यस्फोट

स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, अदनान मुहम्मद कोर्कुट याला (Adnan Muhammad Korkut) गुरुवारी उशिरा गझियानटेपच्या सेहितकामिल जिल्ह्यातील एका अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून वाचवण्यात आलं. अदनाननं बचाव पथकाला सांगितलं की, त्यानं जगण्यासाठी स्वतःची लघवी प्यायली आणि लोक येण्याची तो वाट पाहत होता.

Turkey-Syria Earthquake
मोठी बातमी! Congress अध्यक्षा सोनिया गांधींच्या महाराष्ट्रातील विश्वासू खासदाराचं निलंबन

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात त्यानं म्हटलंय, जगण्यासाठी मी स्वतःची लघवी प्यायली. मी जगू शकलो, यासाठी देवाचे खूप आभार मानतो, असं तो म्हणाला. दरम्यान, कोसळलेल्या इमारतींमधून वाचलेल्यांना बाहेर काढलं जात आहे. एका नवजात बाळालाही ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे.

Turkey-Syria Earthquake
Mahmoud Madani : मुस्लिम बाहेरून आले नाहीत, हा देश जितका मोदी-भागवतांचा आहे तितकाच..; का संतापले मदनी?

मदतकार्य जोरात सुरू

तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू झालंय. एपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीसह सीरियामध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्यामुळं मोठं नुकसान झालंय. या भूकंपाचा फटका सर्वच प्रमुख शहरांना बसल्यामुळं जनजीवनही विस्कळीत झालंय. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे, त्यामुळं बचाव आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणावर चालवलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com