esakal | चीन म्हणतो, 'अफगाणिस्तान आणि नेपाळने पाकिस्तानसारखे बनावे'
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan_china_flags.jpg

लडाखमध्ये भारतासोबत तणाव असताना चीनने पाकिस्तानसोबत मिळून नेपाळ आणि अफगाणिस्तानला आपल्या गटात ओढण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

चीन म्हणतो, 'अफगाणिस्तान आणि नेपाळने पाकिस्तानसारखे बनावे'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बिजिंग- लडाखमध्ये भारतासोबत तणाव असताना चीनने पाकिस्तानसोबत मिळून नेपाळ आणि अफगाणिस्तानला आपल्या गटात ओढण्याचे प्रयत्न चालवले आहेत. चीनने अफगाणिस्तान आणि नेपाळला पाकिस्तानसारखं बनण्यास सांगितलं आहे. चारी देशांनी एकत्र यावे आणि कोरोना महामारीला हरवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही चीनने केलं आहे. 

रशियाकडून चीनला धक्का; भारताला मात्र वेळेवर पुरवठा होणार
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सोमवारी पाकिस्तान, अफगाणिस्तान  आणि नेपाळच्या समकक्ष नेत्यांसोबत पहिल्यांदाच संयुक्त डिजिटल बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना महामारी पसरण्यापासून रोखणे, अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारणे आणि बीआरआय प्रकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी चार सूत्री योजनांवर चर्चा केली. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनुसार, अफगाणिस्तान परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अत्मार आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार गवली यांनी या बैठकीत भाग घेतला होता. मात्र, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भाग घेतला नव्हता. पाकिस्तानचे प्रतिनिधित्व अर्थमंत्री मखदूम खुसरो बख्तियार यांनी केले.

चार देशांच्या या पहिल्या बैठकीत वांग यांनी कोरोना महामारीविरोधात देशांनी एकत्र येणे, कोरोना विषाणू महामारीमुळे करण्यात येणाऱ्या राजकारणापासून दूर राहणे, जागतिक आरोग्य समुदायाचे संयुक्त रुप निर्माण करण्यासाठी संघटनेला त्याची भूमिका बजणावण्यासाठी समर्थन देण अशा मुद्द्यांवर चर्चा केली. अमेरकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून आपली मदत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. आरोग्य संघटना कोरोना महामारीच्या मुद्द्यावरुन चीनला मदत करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. 

नेपाळ आणि अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि आमच्याकडून शिकायला पाहिजे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी क्षेत्रीय सहयोगाची आवश्यकता आहे, असं चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले. आम्ही कोविड-19 वरील लस निर्माण केली आहे. या चार देशांना ही लस पुरवली जाईल. त्यामुळे लोकांची आरोग्य प्रणाली सुधारण्यास मदत होईल, असं वांग म्हणाले आहेत.

चीन-अमेरिका वाद टोकाला; अमेरिकेने ध्वज उतरविला
चीनने यावेळी बेल्ट अँड रोड इनिशेटिव (बीआरआय) प्रकल्पावर चारी देशांनी काम करण्याची गरज व्यक्त केली. कोरोना महामारी संपल्यानंतर चारी देशांनी बीआरआय प्रकल्पावर निश्चयतेने काम करायला हवं. आम्ही चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर (सीपीआयसी) आणि हिमालय कनेक्टिविटी (टीएचसीएन) निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. हा कॉरिडोर अफगाणिस्तानपर्यंत वाढवला जाणार आहे. ज्यामुळे अनेक मार्ग खुले होतील, असंही वांग म्हणाले आहेत. भारत आणि चीनमध्ये तणाव असताना हे वक्तव्य आल्याने याला महत्व आहे.

(Edited By- kartik pujari)