अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हवाई हल्ला! इस्लामाबादमधील लष्करी छावणीला लक्ष्य; असीम मुनीर यांचा जवळचा व्यक्ती ठार

Afghanistan Airstrike: पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तियामध्ये केलेल्या कथित हवाई घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून अफगाण संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांवर हवाई हल्ले केल्याचे म्हटले आहे.
Afghanistan Airstrike

Afghanistan Airstrike

ESakal

Updated on: 

अफगाण संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी पाकिस्तानी लष्करी आस्थापनांवर हवाई हल्ले केल्याचे सांगितले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अफगाण हवाई दलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादजवळील फैसलाबादजवळील एका लष्करी छावणीला लक्ष्य केले. नौशेरा येथील लष्करी छावणी, जमरुदमधील लष्करी वसाहत आणि अबोटाबाद येथेही अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com