तालिबानकडून दानिश सिद्दिकींचं अपहरण करुन हत्या, अफगाणिस्ताकडून शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Danish Sidiqui

तालिबानकडून दानिश सिद्दिकींचं अपहरण करुन हत्या

नवी दिल्ली: पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय फोटोपत्रकार दानिश सिद्दिकी (Danish Siddiqui) यांचा मृत्यू गोळीबारात झालेला नाही. अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली. मागच्या दोन-तीन दिवसांपासून दानिश सिद्दिकी यांचं अपहरण करुन त्यांची हत्या (murder) करण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या. आज अफगाण सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. अफगाणिस्तानकडून (afganistan) पहिल्यांदाच दानिश सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताल अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आला आहे. यापूर्वी अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये (taliban) चकमक सुरु असताना दानिश सिद्दिकी यांचा गोळ्या लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. इंडिया टुडे टीव्हीने हे वृत्त दिले आहे.

दानिश सिद्दिकींचं अपहरण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली. अफगाण राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे प्रवक्ते अजमल ओमर शीनवारी यांनी प्रथमच या वृत्तावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलं आहे. दानिश "सिद्दिकी यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले का? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दानिश यांची ज्या भागात हत्या झाली, तो तालिबानच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे साक्षीदार शोधायला वेळ लागणार आहे" असे अजमल ओमर शीनवारी यांनी सांगितले.

हेही वाचा: लाँग ड्राइव्हच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर नेऊन सामूहिक बलात्कार

मागच्या आठवड्यात अमेरिकेतील एका मॅगझिनने दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू गोळीबारात झालेला नाही. तालिबानकडून अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता. ओळख पटवल्यानंतर दानिश यांची हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा: संजय राठोड-पूजा चव्हाण कॉल रिकॉर्डिंग पोलिसांच्या हाती?

वृत्तवाहिनीसाठी बातमीदार म्हणून दानिश सिद्दिकी यांच्या करीयरची सुरुवात झाली होती. त्यानंतर ते फोटोजर्नलिझमकडे वळले. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी ते फोटोजर्नलिस्ट म्हणून काम करायचे. सप्टेंबर २००८ ते जानेवारी २०१० मध्ये त्यांनी इंडिया टुडे ग्रुपसाठी बातमीदार म्हणून काम केले आहे. दानिश सिद्दिकी सर्वाधिक तणाव असलेल्या अफगाणिस्तानातील कंदहारमधील स्थितीवर रिपोर्टींग करत होते. काही मिशन्सवर अफगाण स्पेशल फोर्सेससोबत ते होते.

Web Title: Afghan Official Confirms Danish Siddiqui Was Captured And Executed By Taliban

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Danish Siddiqui