
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना २२ वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून ( Pooja’s mobile phone) अनेक कॉल रिकॉर्डिंग आढळून आले आहेत.
संजय राठोड प्रकरण: कॉल रिकॉर्डिंग पोलिसांच्या हाती?
पुणे- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना २२ वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून ( Pooja’s mobile phone) अनेक कॉल रिकॉर्डिंग आढळून आले आहेत. यात पूजा आणि कथितरित्या माजी मंत्री संजय राठोड (former Maharashtra minister Sanjay Rathod) यांचे संभाषण आहे. हे कॉल पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या आधी पाच-सहा दिवसांपूर्वी करण्यात आले होते. त्यातील एक संभाषण जवळपास ९० मिनिटाचे असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Pune Police investigating suicide Pooja Chavan found recordings of calls between her and shivsena leader Sanjay Rathod)
पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी मारली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. भाजपने या मुद्द्यावरुन संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. प्रकरण तापल्याने राठोड यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. त्यानंतर पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा: गदारोळामुळे 133 कोटी रुपये वाया
'पूजा चव्हाणशी फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं समजत आहे. पूजाने सर्व कॉलचे रिकॉर्डिंग केली आहे. संभाषण बंजारा भाषेमध्ये झाले होते. पोलीस या संभाषणाचे ट्रान्सलेशन करुन घेत आहेत. संजय राठोड ज्या बंजारा समाजातून येतात, त्याच समाजातून पूजा चव्हाण येते', पोलिसातील सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील माहिती दिली. पूजा बीडची असून ती पुण्यामध्ये एक कोर्स करत होती. तिचे आणि आमदार राठोड यांचे प्रेमसंबंध होते असा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉल रिकॉर्डिंग असलेला पूजा चव्हाणचा फोन पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये Science Laboratory (FSL) पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा: हरीतगृह वायू उत्सर्जनात घट करण्यासाठीचा आराखडा देण्यास भारत, चीनला अपयश
पूजा चव्हाणच्या आत्महत्येपूर्वी २४ तासाआधीचे यवतमाळ मेडिकल कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, फूटेजमध्ये पूजा आणि संजय राठोड यांचा जवळचा साथीदार अरुण राठोड आहे. अरुण आणि त्याचा आणखी एक साथीदार विलास चव्हाण पूजाच्या पुण्याच्या मोहम्मद वाडीतील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहते होते. याच ठिकाणी पूजाचा मृत्यू झाला होता. यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये पूजा अरुण राठोड नावाच्या एका मुलीचे ऑपरेशन झाले होते. ही महिला पूजा चव्हाणच असल्याचा संशय आहे.
Web Title: Pune Police Investigating Suicide Pooja Chavan Found Recordings Of Calls Between Her And Shivsena Leader Sanjay Rathod
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..