२८ हजार फूट उंचीवर प्रसुती कळा, C-17 ग्लोबमास्टरमध्ये बाळाचा जन्म

विमानाच्या कमांडरने विमानात हवेचा दाब वाढवण्यासाठी विमानाला खाली आणलं.
२८ हजार फूट उंचीवर प्रसुती कळा, C-17 ग्लोबमास्टरमध्ये बाळाचा जन्म

वॉशिंग्टन: काबुलहून (kabul) निघालेल्या अमेरिकेच्या लष्करी विमानामध्ये (American plane) एका अफगाणि महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. जर्मनीच्या रामस्टीन एअर बेसवर (Ramstin air base) विमानाने लँडिंग करताच महिला प्रसूत (woman gives birth) झाली. ही घटना शनिवारची आहे. सध्या अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे हजारो अफगाण नागरिक आपला देश सोडण्यासाठी मजबूर झाले आहेत. प्रसूत झालेली महिला अशाच नागरिकांपैकी एक आहे.

C-17 ग्लोब मास्टर विमानामध्ये असताना या महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या असे यूएस एअर मोबिलिटी कमांडने रविवारी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. "विमान २८ हजार फूट उंचीवर असताना विमानात हवेचा दाब कमी असल्याने महिलेला त्रास सुरु झाला" असे अमेरिकन एअर फोर्सने सांगितलं. विमानाच्या कमांडरने विमानात हवेचा दाब वाढवण्यासाठी विमानाला खाली आणलं. ज्यामुळे महिलेची प्रकृती थोडी स्थिर झाली व तिला वाचवता आलं, असं यूएस एअर फोर्सकडून सांगण्यात आलं.

२८ हजार फूट उंचीवर प्रसुती कळा, C-17 ग्लोबमास्टरमध्ये बाळाचा जन्म
आज आम्ही अफगाणिस्तान सोडले नाही, तर कधी सोडणार? - जो बायडेन

जर्मनीच्या रामस्टीन एअर बेसवर विमानाने लँडिंग करताच एअर फोर्सच्या ८६ व्या मेडिकल ग्रुपमधील डॉक्टरांनी महिलेची प्रसुती केली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. बाळाला आणि आईला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com