Afghanistan Blast : मशिदीतील स्फोटात 8 ठार, ISने घेतली हल्ल्याची जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan Mosque Blast

Afghanistan Blast : मशिदीतील स्फोटात 8 ठार, ISने घेतली हल्ल्याची जबाबदारी

काबूल : अफगाणिस्तानातील काबूल शहरातील निवासी भागात काल मोठा स्फोट घडवल्याची घटना घडली आहे. या स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला असून १८ लोकं जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे काबूलमध्ये हाहाकार माजला असून या स्फोटाची जबाबदारी आयएस या इस्लामिक दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

(Afghanistan Blast)

दरम्यान, मस्जिदमध्ये नमाज पठनासाठी गेलेल्या महिला आणि मुलांच्या समुहावर हा हल्ला झाला आहे. हजारा वंशाच्या लोकांना टार्गेट करून हा हल्ला करण्यात आल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेकडून सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक हजारा या वांशिक गटाला लक्ष्य करत पश्चिम काबूलमधून दोन स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

सार-ए करिझ भागातील इमाम बाकीर मशीद या महिलांच्या मशिदीमध्ये एक स्फोट झाला असल्याची माहिती एरियानाच्या वृत्ताने दिली आहे. पश्चिम काबूलमध्ये सुरू झालेल्या हल्ल्यात 20 लोक ठार झाले असून काही लोकं जखमी झाले असल्याची माहिती दहशतवादी गटाने दिली आहे.

हेही वाचा: Patra Chawl Case : संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

मागील काही दिवसापासून अफगाणिस्तानमध्ये आर्थिक मंदीचं सावट आहे. त्यामुळे तेथील काही लोकांची उपासमारी झाली असून अनेक लोकांनी अफगाणिस्तानातून स्थलांतर केलं होतं. त्याचबरोबर दहशतवाद्यांकडून अनेक निर्बंध लादले गेले असून अनेक वेळा हल्ले केले जात असल्याने तालिबानी सत्तांच्या वर्चस्वाखाली अफगाणिस्तान अशांत आहे.

Web Title: Afghanistan Blast 8 Kills Is Claims Responsibility

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..