
अफगाणिस्तानने रशिया युक्रेन या दोन्ही देशांनी संयम राखावा असं आवाहन केलं आहे.
रशिया-युक्रेन संघर्षाची तालिबानला चिंता; हिंसाचार थांबवून शांततेचं आवाहन
युक्रेनमध्ये बिघडलेल्या परिस्थितीवर अफगाणिस्तान लक्ष ठेवून असल्याचं त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला. त्यानंतर जे घडलं ते जगाने पाहिलं. आता युक्रेन-रशिया संघर्षावर मात्र तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानने चर्चेतून तोडगा काढावा आणि शांततेचं आवाहन केलं आहे. रशिया-युक्रेन संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल आणि संभाव्य धोक्याबद्दल काळजीसुद्धा अफगाणिस्तानने व्यक्त केली आहे.
याबाबतचे अधिकृत निवेदन अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले आहे. यात म्हटलं की, आम्ही दोन्ही देशांना विनंती करतो की त्यांनी संयम राखावा. हिंसाचाराला आमंत्रण मिळेल अशी भूमिका घेण्यापासून दूर रहायला हवं असंही अफगाणिस्तानने म्हटलं आहे.
हेही वाचा: Ukraine Russia War : NATO कडेही अण्वस्त्र आहेत, फ्रान्सचा पुतिन यांना इशारा
युक्रेन आणि रशियातील हा संघर्ष चर्चेतून सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. दोन्ही देशांनी शांततेच्या मार्गेने चर्चेतून हा प्रश्न सोडवावा असं आवाहनही अफगाणिस्तानने केलं आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने युक्रेनमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना तिथे शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल विनंती केली आहे. अफगाण विद्यार्थी सुरक्षेकडे आमचे लक्ष असल्याचं अफगाणिस्तानने म्हटले आहे.
Web Title: Afghanistan Concern Statement On Ukraine Russia Conflict Say Need Of Dialogue
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..