अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. इथे रविवार मध्यरात्री एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के जोरदार होते की लोकांना रात्रीतूनच घराबाहेर पडावे लागले. याचे केंद्र अफगाणिस्तानच्या पूर्व भागात असल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपाची तीव्रता ६ ते ६.३ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे.